बाल आनंद मेळाव्यातून व्यवहारीक ज्ञान मिळते -प्राचार्य उत्तम खांडवी

संगमनेर- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री बाळेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, सारोळे पठार या विद्यालयामध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा झाला.
या बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य श्री उत्तम खांडवी, केंद्रप्रमुख मधुकर फटांगरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित फटांगरे, उपाध्यक्ष रामदास गाजरे, पंढरीनाथ घुले, बबन घुले, दत्तू घुले, हे मान्यवर उपस्थित होते. या बाल आनंद मेळाव्यात भजी, पाणीपुरी, मॅगी ,इडली ,ओली भेळ ,सुकी भेळ, चहा, आमलेट पाव , शेजवान राईस, आईस्क्रीम, आप्पे, शेवई मॅगी, सोयाबीन चिल्ली, खाऊचे दुकान व भाजीपाला असे स्टॉल लावण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी स्वतः खाद्यपदार्थ बनविले होते ते खाद्यपदार्थ विकताना त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांची घेऊन देवान पाहून या देशाचे सुजाण नागरिक आहेत असे वाटत होते.बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढावे हाच मुख्य हेतू आहे. या बाल आनंद मेळाव्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. गावकऱ्यांनी ही बाल आनंद मेळाव्याचा आनंद घेतला. या बाल आनंद मेळाव्याला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.