शेतकयांचे वीज कनेक्शन तोडणीचे काम थांबवा- वैभव पिचड यांची जिल्हाधिकाऱ्यां कडे मागणी

अकोले/प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून सुरु असलेले शेतकयांचे वीज कनेक्शन तोडणीचे काम तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांचे कडे केली आहे.
अकोले तालुका हा आदिवासी, अतिदुर्गम व डोंगराळ असून अनेक खेडोपाडयांनी विखुरलेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे शेतकयांच्या हाताला कामे नाहीत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शेतकयांचे वीज कनेक्शन तोडणीचे काम करीत आहे. शेतकयांच्या हाता तोंडाशी आलेला घास ही हिरावून घेतला जात आहे. वीज वितरण विभागाचे काही अधिकारी हे सक्तीची वीज वसुली करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकयांवर अन्याय होताना दिसत आहे. म्हणून महावितरण कडून होणारी कारवाई थांबविणे अत्यंत गरजेचे आहे.असे मत माजी आमदार पिचड यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जि प अर्थ व बांध समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे,भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहूल देशमुख,.अकोले नगरपंचायतीचे भाजप गटनेते बाळासाहेब वडजे , भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व नगरपंचायतीच्या गट अध्यक्ष सौ.सोनालीताई नाईकवाडी, उपाध्यक्ष सौ.प्रतिभाताई मनकर , नगरसेवक सागर निवृती चौधरी, हितेश रामकृष्ण कुंभार, सोनाली चेतन नाईकवाडी ,बाळासाहेब काशिनाथ वडजे ,शितल अमोल वैद्य ,वैष्णवी सोमेश्वर धुमाळ,तमन्ना मोसिन शेख,जनाबाई नवनाथ मोहिते ,कविता परशुराम शेळके आदी उपस्थित होते.
