नेप्तीत तुळजापूर देवीच्या पालखीचे स्वागतभाविकांची दर्शनासाठी गर्दी
अहमदनगर:नगर तालुक्यातील नेप्ती येथे तुळजाभवानी मातेच्या पालखीचे संबळाच्या व आई राजा उदो -उदोच्या गजरात स्वागत करण्यात आले. पालखी गावातील तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. पालखी भल्या पहाटे आली असतानाही गावातील महिला भगिनी, अबाल वृद्धांनी उपस्थित राहुन दर्शन घेतले. गावात पालखी वाजत गाजत, फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत दाखल झाली. ही मिरवणूक गावात भक्तीमय वातावरण निर्माण करून गेली. गावातील मुस्लिम बांधव व सर्व जाती धर्माचे नागरिक या पालखी सोहळ्यास उपस्थित होते . यावेळी सर्वधर्म समभावाचे तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत होते .
पालखीच्या दर्शनासाठी वाडी वस्तीवरील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .
वस्ताद बाबासाहेब पवार व राहुल गवारे यांच्या हस्ते पालखीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी खळगा वस्तीवरील वैष्णवी माता मंदिराकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर पालखी अहमदनगर मार्गे पुढे जाणार आहे . गावात पालखी आणण्यासाठी ग्रामस्थांनी कमी वेळात वेळात चांगले नियोजन केले आणि नागरिकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. यानिमित्ताने सर्व गाव एकत्र आले होते. या पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या.
यावेळी पालखीचे मुख्य मानकरी रवींद्र भगत, गावचे पुजारी बाबासाहेब जपकर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, रंगनाथ गवारे, राजू कुलकर्णी, रामदास गवारे ,अतुल गवारे, रावसाहेब कर्पे, विजय कर्पे, युवराज कर्पे, सागर कर्पे, सतीश होळकर, नानासाहेब बेल्हेकर, उमर सय्यद ,राजू गवारे, छबु फुले, भानदास फुले, बाळासाहेब होळकर, पोपट जाधव, दिपक पवार ,अभिजीत जपकर, भूषण पवार ,अण्णा होळकर, भाऊसाहेब भगत ,शौर्य पवार, अशोक चौरे ,छाया चौरे ,शोभा पवार व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.