नवीन चांदगाव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी अर्जुन उंदरे तर व्हा.चेअरमन रवींद्र खंडागळे यांची निवड

सोनई-प्रतिनिधी
—नेवासा तालुक्यातील ना.शंकरराव गडाख पा.यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या नवीन चांदगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अर्जुन एकनाथ उंदरे तर व्हा.चेअरमन पदी रवींद्र नामदेव खंडागळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.अध्यक्षस्थानी माजी चेअरमन विश्वनाथ उंदरे हे होते.संस्थेचे वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
माजी अध्यक्ष विश्वनाथ उंदरे म्हणाले ,नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी सर्वाना विश्वासात घेऊन नीटनेटका कारभार करावा,व कार्यास शुभेच्छा दिल्या.
नेते देविदास उंदरे ,राजेंद्र उंदरे संभाजी माळवदे, यांनी संस्था चालवत असताना हित लक्षात घेऊन सभासदांना फायदा होईल असे पाहिले जाईल व सर्व सभासदांना सर्व योजनेचा लाभ दिला जाईल सभासद वर्गानी घेतलेले कर्ज मुदतीत फेडले पाहिजे,असे मत व्यक्त केले.
या वेळी नवनिर्वाचित संचालक चंद्रभान उंदरे , राम उंदरे ,राम जवने, निवृत्ती झेंडे , सुधीर सांगळे, मारुती कांबळे , शबीर शेख, व संस्थेचे मार्गदर्शक दादा .पा. उंदरे, नामदेव खंडागळे( गुरुजी),सरपंच शंकर उंदरे,उपसरपंच मुरलीधर सोनवणे,नामदेव कांबळे,विठ्ठलराव उंदरे, सावळेराम चौधरी, राजेंद्र सांगळे,देवराव चौधरी , अशोक सांगळे,गोकुळ सोनवणे, भाऊराव सांगळे,रवींद्र राऊत, भाऊसाहेब नवगिरे , भाऊसाहेब झिने अशोक चोरमारे, उपस्थित होते.निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून आर.एन.जहागीरदार यांनी काम पाहिले,सचिव व्ही.एम.खंडागळे यांनी सहकार्य केले.प्रस्ताविक देविदास उंदरे तर आभार दादा सांगळे यांनी मानले. यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.