बुलढाणा प्रतिनिधी
नेताजी बोस व स्व. ठाकरे जयंती साजरी देऊळगाव राजा राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालय,सिनगाव जहागीर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समिती अध्यक्ष भिवाजी काकड बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे सैनिक जावेद पठाण माजी सैनिक भिमराव उबाळे, ग्रा.पं सदस्य महादू बंगाळे यांची उपस्थित होती. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या निमित्ताने हजर अध्यक्षस्थानी
असलेले भिवाजी काकड यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केले, तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी
दूंगा म्हणत विदेशात कैद असलेल्या भारतीय सैनिकांना
एकत्रित करून आझाद हिंद सेनेची स्थापना केली. भारतावर
सत्ता असलेल्या ब्रिटिश सरकार विरोधात जपान जर्मनीच्या
सहकार्याने युद्ध पुकारले मात्र लहरी हवामानामुळे आणि
दुसऱ्या महायुद्धात जपान आणि जर्मनीच्या झालेला पराभव
या कारणांमुळे नेताजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देता
आले नाही ही सल त्यांच्या मनात कायम राहूनच गेली.
संतोष डोईफोडे पुढे बोलताना म्हणाले की, बाळासाहेबांनी
सामान्य कार्यकर्ता मोठा बनविला. त्यांचा शब्द हा बंदूकीच्या
गोळी सारखा निघत, बाळासाहेबांनी एकदा बोललेला शब्द
कधीच माघारी घेतला नाही किंवा त्याशब्दात फिरवाफिरवी
आयुष्यात केली नाही. ते ठामपणाने सांगत होय मी ते
बोललोच, असा धाडसीपणा त्यांच्या मधे बघायला मिळतं.
बोलताना त्यांच्या शब्दांना तलवारी सारखी धार असायची.
उपस्थित सर्व मंडळीनी या दोन महापुरुषांचा आदर्श घेतला
पाहिजे असे मत शिक्षक डोईफोडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी
गावातील अँड संतोष डोईफोडे, गुलाबराव पाटोळे, बाबुराव
पाटोळे, रावसाहेब सरोदे, वैभव उबाळे, आकाश मोरे, दतात्रेय
शिंदे, विजय बंगाळे, संजय डोईफोडे,किरण बोर्डे, अनिकेत
मोरे, समाधान उबाळे,अनिल म्हस्के, इरफान सय्यद, आकाश
खरात आदींची उपस्थिती होती. सर्वांचे आभार वाचनालयाचे
अध्यक्ष भगवान मुंढे यांनी मानले.