अकोले नगरपंचायत चे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण व्यक्तीसाठी
खुले

अकोले प्रतिनिधी
अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण (व्यक्ती) साठी आरक्षित झाले आहे.
अकोले नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली 17 जागा पैकी या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 12 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादीला 2 शिवसेनेला दोन आणि काँग्रेसला एक असे पक्षीय बलाबल या नगरपंचायत मध्ये आहे भाजपच्या सर्वाधिक जागा असल्याने भाजपचा नगराध्यक्ष होणार हे आता स्पस्ट झाले आहे
आज गुरूवारी मुंबई येथे मंत्रालयात राज्यातील 135 नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. कोविड प्रादुर्भाव सुरु असल्याने या सोडतीचे दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्तालयात आयोजित केले होते.यावेळी चिठ्ठीद्वारे काढण्यात आलेल्या आरक्षणात अकोले
नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण (व्यक्ती) निघाले आहे.यामुळे अकोल्याचा नगराध्यक्ष कोण होणार याकडेच आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहे
माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड हेच नगराध्यक्षपदाचे किंगमेकर असून ते कोणाला संधी देतात याकडे आता अकोलेकरांचे लक्ष लागले आहे 12 नगरसेवकां पैकी नवीन नगरसेवकाला की अनुभवी नगरसेवकाला या ठिकाणी संधी मिळते या कडे अकोले करांच्या नजरा लागून आहे