ग्रामीणमहाराष्ट्र

जादूगार पी. बी. हांडे सोशल फाउंडेशनने केला प्रजासत्ताक दिन साजरा ‌

अकोले प्रतिनिधी
जादूगार हांडे फाउंडेशन सातत्याने राष्ट्रीय सण महापुरुषांच्या जयंती ,पुण्यतिथी साजरी करतात ,विविध प्रबोधनात्मक उपक्रम साजरे करतात ,गुणवंत मान्यवर विद्यार्थी यांचा वेळोवेळी यथोचित गौरव करतात.
सालाबाद प्रमाणे दिनांक
२६ जानेवारी २०२२ रोजी संस्थेच्या परिसरात प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला.
माननीय ए.बी. देशमुख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अकोले नगरपंचायत अकोलेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेवक मंडलिक विमल संतु, चौधरी सागर निवृत्ती ,मनकर
प्रतिभा वसंत ,कुंभार हितेश रामकृष्ण ,नाईकवाडी सोनाली लक्ष्मीकांत ,रूपवते श्वेताली मिलिंद,शेख आरिफ शमशुद्दिन, वैद्य शीतल अमोल ,शेटे नवनाथ विठ्ठल, धुमाळ वैष्णवी सोमेश्वर, शेख तमन्ना मोसिन ,नाईकवाडी प्रदीप बाळासाहेब ,शेणकर माधुरी रवींद्र, शेळके कविता परशुराम इत्यादी नगरसेवकांचा संस्था अध्यक्ष विश्वविक्रमवीर जादूगार पी .बी. हांडे व कवयित्री मंदाकिनी हांडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, सन्मानपत्र, पुष्प गुच्छ व जादूगार हांडे फाउंडेशनची लोक सारथी २०२२ दिनदर्शिका देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ए .बी .
देशमुख सर, माजी नगरसेवक प्रमोदजी मंडलीक व मनोहर तळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ,नगरसेवक सोनाली नाईकवाडी ,
नवनाथ विठ्ठल शेटे, कुंभार हितेश रामकृष्ण यांनी सन्मानाला उत्तर देताना आमच्या प्रभागातील विकास कामांसाठी कटीबद्ध राहू. व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व धन्यवाद दिले. सदर प्रजासत्ताक दिन सोहळा व सन्मान सोहळ्यास मेजर भास्कर तळेकर ,एस .टी .चासकर सर, राम तळेकर, मेजर संतोष भोर ,डॉक्टर सुभाष आरोटे , शाहिर एस.एस.शिंदे,मच्छिंद्र मंडलिक, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ नवले, किसन वाकचौरे सर , ,मा.सविता चासकर, मा.लोखंडे तात्या,मा.आनंद विसपुते,मा.गबालेइत्यादी मान्यवर तसेच अकोले होमगार्डचे पथक ,शिवाजीनगर अकोले ग्रामस्थ,मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर प्रसंगी कवयत्री मंदाकिनी हांडे यांनी शिवराय जन्माचे गीत सादर केले ,या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष जादूगार हंडे यांनी संस्था राबवत असलेले विविध उपक्रमांची माहिती दिली व लोकसहभागा बद्दल ऋण व्यक्त केले. तसेच सूत्रसंचालन अकोले होमगार्ड प्रमुख व अकोले नगरपंचायत वाचनालय ग्रंथपाल मा. पुष्पा नाईकवाडी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button