
अकोले प्रतिनिधी,
देशाचा भारतीय प्रजासत्ताक दिन 72वा मोठ्या उत्साहात जि. प.प्रा. शाळा माळीझाप येथे साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष श्री. मच्छिंद्र मंडलिक, मा. नगरसेवक प्रमोद मंडलिक, रामनाथ मंडलिक सर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अभंग मॅडम, अंगणवाडीच्या चौधरी मॅडम, पांडे मॅडम, आदी उपस्थित होते.
प्रमोद मंडलिक व रामनाथ मंडलिक सर यांची शुभेच्छापर भाषणे झाली. विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनावर भाषणे झाली. सूत्रसंचालन गोडे सर तसेच आभार काटेकर सर यांनी केले.
