इतर

सुपा औद्योगिक वसाहतीची झोपडपट्टी करु नका.. अविनाश पवार



दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहती मध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असताना सुद्धा अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत तर काही कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. सुपा औद्योगिक वसाहती मधील उमा प्रेसिडेंट,श्री जी ,मास्क फासनर,संजीवनी, क्लास पाॅलीमर,राज दिप, अशा असंख्य कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत एक तर एमआयडीसी मध्ये हव्या असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने किंवा कुणाच्या दबावाला बळी पडून कंपन्या बंद झाल्या आहेत.हे शोधनं गरजेचं आहे.त्यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा पुर्णपणे दिसतो आहे.प्रत्येक वेळी दुर्लक्ष केल्यामुळे अता परत एक औषध निर्मीती करणारी कंपनी जागे अभावी स्थलांतरित होणं मोठी शोकांतिका नव्हे तर संशयास्पद आहे. १००कामगार बेरोजगार होणं म्हणजे धक्कादायक व गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन कामगार आयुक्त नितीन कवले यांनी व औद्योगिक अभियंता हेमांगी पाटील ,नितीन गवळी यांनी संबंधित कंपनी व्यवस्थापनाकडे या संदर्भात गांभीर्याने चौकशी करून नेमका काय प्रकार आहे याकडे लक्ष द्यायला हवे १०० कामगारांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेऊन उद्योग टिकवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे तसेच औद्योगिक वसाहती मध्ये छोट्या उद्योगांना कुणाकडून ञास वगैरे होतो की काय हे पण शोधून काढणं गरजेचं आहे या अगोदर पण बरेच उद्योग स्थलांतरित अथवा बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे तसेच औद्योगिक वसाहती मध्ये उद्योजकांना कुणाचा दबाव वगैरे काही आहे की काय? तसे काही असेल तर व्यवस्थापनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनासह महसूल प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करुन नेमका खरा प्रकार जनतेच्या समोर आणणं गरजेचं आहे तसेच सुपा जुनी औद्योगिक वसाहती मध्ये सुरू असलेल्या छोट्या उद्योगांना बळकट करण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजकांच्या अडचणी संदर्भात लक्ष घालायला हवे जर छोट्या उद्योजकांना बळकट केलं नाही तर सुपा एमआयडीसी ची झोपडपट्टी होण्यास वेळ लागणार नाही.

सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये चालणारे अनाधिकृत उद्योग बंद व्हायला हवेत .या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कामगार आयुक्तासह अभियंत्याची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button