सोनईच्या गुणवान लेकरांचा सन्मान सोहळा

विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी
सोनई येथील प्रत्येक माणसांनी आपापल्या परीने विविध क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं,असे अनेक व्यक्ती म्हणून काम करत आहेत, त्याचच एक भाग म्हणून आज आम्ही सोनई कराच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्ती चा कौतुकी नदीपात्रात गुणगौरव सोहळा संपन्न झाला
.मा.सरपंच राजेंद्र बोरुडे,सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी शिकारे,सायकल पट्टू शरद काळे पाटील,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर, चला हवा येऊ द्या च्या हशयसम्राट अभिनेता अभिषेक बारहाते,राज्य परिवहन मंडळातील अशोक क्षीरसागर, व माजी सरपंच अंबादास राऊत आदी मान्यवरांचा उद्योजक शिवाशेठ बाफना, जिल्हा परिषद सदस्य अशोक साळवे,डॉ. शिरसाठ, प्रगतशील शेतकरी जालिंदर येळवंडे,किशोर घावटे यांनी आम्ही सोनई कराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
एक आगळा वेगळा उपक्रमात सूत्रसंचालक एस.बी.शेटे यांनी कर्तृत्ववान यांना जीवनातील चढ उतार विषयी अनेक प्रश्न विचारले, त्यात सर्वांनी आपापल्या क्षेत्रातील संकट,अनुभव, कौटुंबिक माहिती,चागल्या वाईट परिणाम सांगितले, कोणी आनंद अश्रू,कोणी गंभीरता घेऊन बोलत होते.
प्रारंभी कोरोनाने अचानक जे दिवंगत झाले त्यांना आप्पासाहेब निमसे यांनी सहवासातील दुःख व्यक्त करून एकत्रित शब्दपर श्रध्दांजली वाहिली.
या उपक्रमाला आवर्जून उपस्थित असे जेष्ठ नागरिक अमृतराव काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका पुष्पलता काळे,आघाव गुरुजी,कार्यकर्ते उदय पालवे, पंचायत समिती सदस्य कारभारी डफाळ,युवाकार्यकर्ते प्रकाश शेटे,सुभाष गडाख,शकील बागवान,राजू कदम, महमीने सर,मधुकर सुरसे,विलास क्षीरसागर, मनोहर सुद्रीक,रमेश सुद्रीक, सीताराम घावटे,आढाव, आदी आम्ही सोनाईकर ग्रुप उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुभाष राख यांनी तर आभार डॉ. शिरसाठ यांनी मानले. राजकारण विरहित आगळा वेगळा कार्यक्रम केल्याबद्दल ह्या कार्यक्रमाची विशेष चर्चा सोनई परिसरात सुरू झाली आहे.