भारतीय,मजदूर संघाचे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करण्याचा निर्णय

पुणे दि। 10
भारतीय मजदूर संघाच्या पाटणा बिहार येथील राष्ट्रीय अधिवेशनात संघटीत, असंघीटत कामगारांना न्याय मागण्यासाठी चार प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
1) सर्व कामगारांना करिता सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे.
2) कंत्राटी कामगार पध्दती बाबतीत सरकार व प्रशासना चा मनमानी कारभार बंद करण्यात येऊन कंत्राटी कामगार कायद्याचे कामगारांच्या हितासाठी पुर्नरचना करावी .
3) आर्थिक विकासा करिता श्रम निती बनवा
4) किमान वेतन च्या ऐवजी लिव्हींग वेज मिळावे .
असे ठराव भारतीय मजदूर संघाच्या पाटणा बिहार येथील राष्ट्रीय अधिवेशनात संमत करण्यात आले आहेत. अधिवेशन च्या समारोप प्रसंगी अखिल भारतीय संघटन मंत्री श्री बी सुरेंद्रन यांनी सर्व जिल्हा ठिकाणी आंदोलने, धरणा आंदोलन करून याच्या प्रती मा जिल्हाधिकारी यांच्या व्दारे मा पंतप्रधान भारत सरकार यांना पाठवुन कामगारांच्या मध्ये जनजागृती करावी असे आवाहन केले आहे.
या प्रसंगी सभा अध्यक्ष भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्यमय पंड्या व महामंत्री रविंद्र हिमते उपस्थित होते.
या वेळी विविध ऊद्योगातील, राज्यातील भारतीय मजदूर संघ संघाच्या पदाधिकारी यांनी घोषणानी स्वागत केले आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र आंदोलना व्दारे जनजागृती करून निवेदन देणार आहे असे भामसंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे यांनी सांगितले आहे.
तसेच या आंदोलनात महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवहान महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.
