ग्रामीणमहाराष्ट्र

हिंदीरत्न पुरस्कार प्राप्त पोपटराव आवटे यांचा माजी आमदार नरेंद्र घुले यांच्याकडुन गौरव ‌


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगावने तालुका शेवगाव संचलित भातकुडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भातकुडगाव तालुका शेवगाव मधील हिंदी विषयाचे प्राध्यापक श्री.पोपटराव हरिश्चंद्र आवटे यांना नुकताच राष्ट्रीय हिंदी परिषद मेरठ (प्रबुद्ध भारताची अखिल भारतीय संस्था नवि दिल्ली) तर्फे दिला जाणारा भारतीय स्तरावरील “आदर्श हिंदी रत्न”पुरस्कार राष्ट्र भाषा हिंदी परिषद मेरठ (नवि दिल्ली) चे अध्यक्ष माननीय श्री मोहित जैन, संगठन मंत्री श्री विजय वीर रसतौगी,महामंत्री सौ.मीनाक्षी शास्त्री, हिंदी साहित्य सेवा संस्थान प्रयागराज, अध्यक्ष डॉ शहाबुद्दीन शेख या सर्वांच्या शुभ हस्ते स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्रा.पोपटराव आवटे यांनी हिंदी भाषा प्रचार व प्रसार तसेच हिंदी साहित्यातील विविध प्रकारच्या योगदानाची दखल घेऊन तसेच या पुर्वी भारतीय दलित साहित्य अकादमी नवि दिल्लीचा महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप अवार्ड, राष्ट्रीय हिंदी महासंघ इंदौरचा आदर्श हिंदी अध्यापक, आत्मोन्नती व विश्व शांती संस्था तर्फे राज्य स्तरीय सद्धधर्म गौरव पुरस्कार,इंटरनॉशनल ह्युमन राईट असोसिएशन सातारा तर्फे राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेन्द्रजी पाटील घुले, यांच्याकडुन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, पंचायात सामितीचे माजी सदस्य भास्कारराव शिंदे, यांच्यासह त्यांचा शब्दगंध साहित्य परिषदेचे शेवगाव तालुका अध्यक्ष हरिभाऊ नजन त्याच्या साहित्य परिवारासह कामधेनु पतंसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, जेष्ठ पत्रकार आर. आर.माने, रविंद्र मडके, शहाराम आगळे यांनीहि त्यांचे अभिंनदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button