चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन इदे ला केले जिल्हा तडीपार!

राजूर /प्रतिनिधी..
राजूर पोलीस स्टेशन हददीमध्ये राहणारा सचिन बाळु इदे यांने राजूर पोलीस स्टेशन हददीमध्ये दिवसा व रात्री घरफोडया करुन चोरी केल्या बाबत राजूर पोलीस स्टेशनला 1) गु.र.नं 45/2018 भा द वि कलम 380, 2) गु.र.नं 56/2018 भा द वि कलम 457, 380, 3) गु.र.नं 186/2020 भादवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हे दाखल होते. तसचे राजूर पोलीस स्टेशन हददीमध्ये दारुबंदी असतांना सदर इसम हा अवैधरित्या दारु विक्री करतांना मिळुन आला त्यावरुन राजूर पोलीस स्टेशनला 4) गु.र.नं 284/2020 मु.प्रो. अॅक्ट 65 (ई) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
वरील प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी सचिन बाळु इदे याचेवर अंकुश ठेवणे करीता त्याचा अहमदनगर जिल्हयातुन तडीपार होणे बाबतचा प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर यांचेकडे पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावाची मा. उपविभागीय दंडाधिकारी यांनी चौकशी करुन सचिन बाळु इदे यास अहमदनगर जिल्हयातुन सहा महिने तडीपार करणे बाबतचा आदेश पारीत केल्यांने सचिन बाळु इदे यास अहमदनगर जिल्हयातुन 6 महिन्या करीता तडीपार करण्यात आले आहे.