शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील खिरविरे(शेणित)येथे आज दिनांक 28.01.2022 रोजी खिरविरे बीटस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा कोविड नियमांचे पालन करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या मा.सुषमाताई दराडे होत्या. तसेच खिरविरे बीटाचे शिक्षण विस्ताराधिकारी मा. संभाजी झावरे , खिरविरे व मान्हेरे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. दिलीप नवाळी , पिंपरकणे केंद्राचे केंद्रप्रमुख कोरडे उपस्थित होते.
खिरविरे बिटातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद सदस्या मा. सुषमाताई दराडे यांचेकडून ट्रॉफी, श्रीफळ, पेन व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शेलविहिरे, मुठेवाडी, बाभुळवंडी, बांबळेवाडी, पिंपरकणे, धारवाडी, वाकी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्यासमवेत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांचाही सत्कार करण्यात आला. ही सत्काराची प्रेरणा जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई दराडे व खिरविरे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी.संभाजी झावरे यांच्या प्रेरणेतून साकारली गेली.
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून भावी अधिकारी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर आपण भरपूर यश प्राप्त करू शकतो हेही आपल्या अनुभवातुन कथन केले. केंद्रप्रमुख नवाळी यांनी आपल्या शालेय जीवनातील विविध अनुभव सांगून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालकांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात आमचे पाल्य शिक्षण घेत आहेत. तरीसुद्धा एवढे यश संपादन करत आहे याबद्दल खूप खूप समाधान व्यक्त केले. तसेच याचे सर्व श्रेय शिक्षक व अधिकारी वर्ग यांना दिले. व आभारही मानले. तसेच अध्यक्षीय भाषणातून सुषमाताई दराडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी प्रसंग सांगितले व पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उत्तमोत्तम मार्गदर्शन केले. व पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी वर्ग यांचेही या यशाबाबत अभिनंदन केले. विद्यार्थी दीक्षा कुलाळ, शिक्षक कैलास सारोक्ते सर, ज्ञानेश्वर सोनवणे, व पालक भाऊसाहेब पिचड, दशरथ कुलाळ यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भावी कार्यासाठी व उत्तमोत्तम यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोरे सर व ज्ञानेश्वर सोनवणे सर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन कैलास सारोक्ते सर यांनी केले.