नंदुरबारात मयत पोलीस अंमलदारास अशीही श्रध्दांजली!

नंदुरबार- जिल्ह्य़ातले पोलिसिंग नेहमी चर्चेत असते.नंदुरबार जिल्ह्याचे पोलीसप्रमुख सतत नवनवीन प्रयोग राबवत असतात तेथील पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व अंमलदारास आपल्या बॉसबद्दल..एस.पीं. बद्दल अभिमान वाटतो. तेथील प्रत्येक कनिष्ठ सहकाऱ्यांस वाढदिवसाला हे एस.पी. न चुकता फोन करून शुभेच्छा देतात.कोणी पोलीस आजारी असेल तर त्याला भेटायला स्वतः जातातच पण कोणी पोलीस फारच आजारी असेल तर घरी किराणामाल पोहचवितात. कर्तव्यावर कर्मचारी मयत झाल्यास त्याच्या कुटुंबियास स्वेच्छेने पाच लाखांहून अधिक रक्कम जमा करून देण्यात येते.
नंदुरबार जिल्ह्य़ातील सर्व पोलीसांचे डोळे भरून आले अशी एक घटना नुकतीच घडली.विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विश्वास गावित यांचे ब्रेन हॅमरेज मुळे नुकतेच कर्तव्यावर निधन झाले. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे परिषद पार पडली. परिषदेच्या सुरुवातीलाच पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना जागेवर स्तब्ध उभे राहण्याची सूचना करून मयत झालेले आपले सहकारी हवालदार विश्वास गावित यांना श्रद्धांजली वाहिली.एका कनिष्ठाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने भर गुन्हे सभेत दाखवलेली ही माणुसकीची भावना विरळाच !
पोलिसाबद्दल आपुलकी दाखविणाऱ्या या बाॅसची व त्याच्या या कृतीची सध्या पोलीस दलात चर्चा आहे.