पत्रलेखन कला तरल माध्यम : प्रा.रमेश भारदे

शब्दगंध च्या पत्रलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण
शहाराम आगळे
शेवंगाव तालुका प्रतिनिधी
पत्रलेखन ही जगणे सूंदर करणारी कला आहे,शालेय विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती चे तरल माध्यम असलेली ही कला उद्याचे लेखक – कवी नक्कीच तयार करील असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक रमेश भारदे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य शाखा शेवंगाव च्या वतीने आयोजित पत्रलेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.यावेळी वंचित बहुजन आघाडी चे प्रा.किसन चव्हाण, बापूसाहेब गवळी,पोस्टमन कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी गायकवाड, शब्दगंध चे कार्यकारणी सदस्य रामकिसन माने, तालुकाध्यक्ष हरिचंद्र नजन,नाट्य परिषदेचे शेवंगाव शाखा अध्यक्ष प्रा.उमेश घेवारीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री.भारदे म्हणाले कि, व्हाट्स अप,फेसबुक च्या जमान्यात आत्ताची पिढी मामा,मावशी,आजोबा आज्जी,मित्र,मैत्रीण, नातेवाईक यांना पत्र पाठवून आनंद घेत नाही, तो आनंद या स्पर्धेमुळे मिळत आहे.
यावेळी बोलतांना प्रा.किसन चव्हाण म्हणाले कि, पोस्टमन प्रतिनिधींना पारितोषिक वितरण समारंभास बोलावून तमाम पोस्टमन बांधवांचा सन्मान शब्दगंध ने केला आहे,या आगळ्या वेगळ्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद देऊन ही कला जिवंत ठेवण्याचे प्रयोजन केले आहे.यावेळी हरिचंद्र नजन,उमेश घेवारीकर,पत्रकार शहाराम आगळे यांची भाषणे झाली. प्रथम क्रमांक सृष्टी कांबळे(दहिगाव ने),द्वितीय क्रमांक ओंकार उदारे(पाथर्डी), प्रेरणा बैरागी(शेवंगाव)तृतीय क्रमांकाचे व शुभम वावरे,साक्षी काथवटे,कार्तिकि भुसारे,महेश शिंदे,रोहन काळे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.या स्पर्धेत कोपरगाव, राहुरी,श्रीरामपूर, पाथर्डी,पारनेर,नगर,शेवंगाव तालुक्यातील ७२ स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी प्रा.विजय हुसळे,जेष्ठ साहित्यिक विठ्ठल सोनवणे,वैभव रोडी,टाके सर इ मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुग्धा घेवरीकर हिच्या बाल कविता संग्रहाला बालकुमार संस्थेचा राज्य पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला. शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे,खजिनदार भगवान राऊत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.