अहमदनगर

निघोज मध्ये शुभविवाहात सामाजिकतेचे दर्शन

सत्काराला फाटा देत राणीताई लंके यांचे हस्ते गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप!

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
आपल्या सामाजिक कार्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कार्यात अल्पसा हातभार लावता यावा म्हणून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रस्थानी असणारे निघोज येथील आदर्श शेतकरी युवा उद्योजक ,अडचणीत असणाऱ्या सामान्य नागरिकांना नेहमीच दातृत्वाची भूमिका ठेवणारे उद्योजक अमृताशेठ रसाळ यांचा चिरंजीव सागरच्या शुभमंगल प्रसंगी मानवतेचे दर्शन पाहावयास मिळाले .
कुठल्याही सत्कार समारंभास किंवा मंगलमय कार्यात सन्मान करण्यासाठी शाल,बुके , फेटे यासाठी अनाठायी खर्च करत आपली श्रीमंती दाखवण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात . परंतु आमदार निलेश लंके यांचे सार्वभौम कार्य पाहून गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी मुलांना विद्यादाना सारखे पवित्र कार्यात आपल्या आयुष्याची बाराखडी गिरवण्यासाठी पायपीट करत शाळेत जावे लागते . त्यांना अल्पशी मदत मिळावी म्हणून .अमृता शेठ रसाळ व मळगंगा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना सत्काराच्या अनाठायी खर्चाला फाटा देऊन जि . प . सदस्या सौ.राणीताई निलेश लंके यांच्या शुभहस्ते शुभमंगल प्रसंगी सायकल वाटप करण्यात आली . व यातून मानवतेचे व सामाजिक दातृत्वाचे दर्शन रसाळ परिवाराने या शुभ मंगल प्रसंगी दाखवून दिले .
आमदार निलेश लंके हे प्रत्येक कार्यक्रमात सांगतात की माझा सत्कार हा शाल बुके या किमती वस्तूंनी करण्यापेक्षा शालेय साहित्य सायकल या प्रकारे वस्तूंनी करावा जेणेकरून गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल तेच विचार आंगीकरून केलेल्या या सामाजिक कार्याचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक केले असून या पुढील काळातही इतर शुभविवाह व सत्कार समारंभाच्या वेळी असेच सामाजिक उपक्रम राबवत आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असेही आमदार निलेश लंके यांनी सांगितले .
यावेळी राणीताई निलेश लंके यांच्या समवेत राज्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेश सरडे , वंदना गंधाक्ते ,पारनेर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अर्जुन भालेकर , श्रीकांत चौरे ,डॉक्टर कावरे भूषण शेलार ,किसन रासकर , शिवाजी सालके, सतिष गंधाक्ते ,बाळासाहेब लंके , अरुण पवार , संदीप सालके , दीपक मुळे ,नगरे,प्रवीण शेळके यांच्यासह सर्व सरपंच , चेअरमन सर्व पक्षाचे पदाधीकारी सर्व क्षेत्रातील अधीकारी , कर्मचारी , निघोज ग्रामस्थ , निलेश लंके प्रतीष्ठानचे कार्यकर्ते , सावता परीषद , समता परिषदेचे सर्व पदाधिकारी , निघोज संस्था परीवाराचे अध्यक्ष वसंत कवाद सर व पत्रकार मित्र यांच्या सह अनेक मान्यवर व रसाळ परिवार प्रेम करणारे नातेवाईक व निघोज ग्रामस्थ यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button