राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०१/०२/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १२ शके १९४३
दिनांक :- ०१/०२/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२२,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति ११:१६,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति १९:४४,
योग :- व्यतीपात समाप्ति २७:०९,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति २१:५१,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- मकर – श्रवण,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:३२ ते ०४:५७ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ११:१८ ते १२:४३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:४३ ते ०२:०८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३२ ते ०४:५७ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
इष्टि, महोदयपर्व सूर्योदयापासून ११:१६ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १२ शके १९४३
दिनांक = ०१/०१/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल. घरात सुखदायक प्रसंग घडतील. शारीरिक स्वास्थ्य वाढेल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. जीवनसाथीदाराबरोबरच्या संबंधात जवळीक वाढेल.

वृषभ
आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपारनंतर या तक्रारीपासून मुक्तता मिळेल. मानसिक दृष्ट्या पण तणाव दूर झाल्याचा अनुभव येईल.

मिथुन
आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. अचानक धन खर्च करावे लागेल.

कर्क
अविचाराने कोणतेही कार्य नका. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यासमोर टिकून राहाल. दुपारनंतर थोडी प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे.

सिंह
आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा असे श्रीगणेश सुचवितात. घरातील सदस्यांबरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभाची शक्यता. दुपारनंतर मात्र सांभाळून राहा.

कन्या
आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. विदेशातील व्यापारात यश मिळेल आणि लाभ होईल.

तूळ
संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवा. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी आणि निर्णय विचारपूर्वक ठरवा. गैरसमज दूर करा. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.

वृश्चिक
जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ असेल. उत्पन्न आणि व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत. मित्रांसमवेत प्रवासाला, फिरायला जाल. तेथे आपला वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढेल. सबब कोणाशीही उग्रतापूर्ण व्यवहार करू नका.

धनु
आज आपली कामाची योजना व्यवस्थित पूर्ण होईल. व्यवसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप वरचे पद मिळेल. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण असेल. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. प्रवास, पर्यटनाचा योग आहे.

मकर
परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशाची शक्यता आहे. धार्मिक यात्रेमुळे आज धर्मप्रवणतेचा अनुभव येईल. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात पदोन्नती मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांना पण आपल्या कामामुळे आनंद वाटेल. धना बरोबरच मान- सन्मान वाढीस लागेल. पित्याकडून लाभ होतील.

कुंभ
नव्या कामाची सुरुवात आज करू नका. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी उग्र चर्चा अथवा मतभेद टाळू शकाल. दुपारनंतर प्रसन्नता वाढेल तब्बेतीतही सुधारणा जाणवेल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन कराल.

मीन
व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. एखादया मनोरंजक स्थळी स्नेह्यांसोबत आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत बदल झाल्याचा अनुभव येईल. दुपारनंतर नवीन कार्याचा आरंभ करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी भांडण होऊ शकते.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button