इतर

नवरदेव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे – निर्माता- निरंजन देशमुख

अकोले प्रतिनिधी

नवरदेव चित्रपट सामाजिक प्रबोधन करण्यात यशस्वी ठरला आहे प्रेक्षकांना या चित्रपटाच्या कथेची भुरळ पडली असून ज्या ज्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होतो तिथे तिथे केवळ माऊथ पब्लिसिटी ने प्रेक्षक थिएटरकडे गर्दी करतात हे दिसून आले आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचवायचा आहे असे नवरदेव चित्रपट निर्माता -दिग्दर्शक निरंजन देशमुख यांनी सांगितले

लग्नसराई सुरू झाली आहे परंतु याही वर्षी शेतकरी मुलांच्या लग्नासाठी त्यांच्या आई-वडिलांना वधू साठी दारोदार हिंडावे लागत आहे हे भयानक वास्तव आहे, मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा अवास्तव अपेक्षा त्याचबरोबर शेतीकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन या कारणांमुळे सर्व काही असून सुद्धा प्रत्येक गावात 40 ते 50 अविवाहित मुले बायकोच्या शोधात आहेत ही ज्वलंत समस्या उभ्या महाराष्ट्रात आहे आणि याच विषयावर प्रभावी भाष्य करणारा चित्रपट एका पत्रकाराने बनवला आहे

नवरदेव हा सामाजिक प्रबोधनात्मक जनजागृती करणारा चित्रपट अकोले, संगमनेर आणि लोणी येथील मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये यशस्वी ठरला आहे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला भगिनींनी चित्रपटाचे केलेले कौतुक होय.
चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक निरंजन देशमुख प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल समाधानी असून चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक जण शेतकरी बांधवांविषयी आस्थेने बोलतो, हेच या चित्रपटाचे खरे यश असून महिला भगिनी भावनिक होऊन त्या देखील पुढे येऊन बोलत आहेत मुलींनी नोकरी आणि शहराच्या मागे न धावता ग्रामीण भागातच शेतीपूरक व्यवसाय करून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत असे प्रत्येक जण चित्रपट बघितल्यानंतर बोलत आहे.
नवरदेव चित्रपट दोन तास वीस मिनिटांचा असून त्यात चार गाण्यांचा समावेश आहे.

हा चित्रपट केवळ मनोरंजनाचा भाग न राहता तो आता एक सामाजिक चळवळ म्हणून पुढे येत आहे हे महत्त्वाचे. लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेला हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी

चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक पत्रकार निरंजन देशमुख हे स्वतः आपल्या मोटरसायकलवर घरोघर जाऊन चित्रपटाचे तिकीट विकत असून अतिशय आत्मियतेने आणि तळमळीने शेतकरी बांधवांसाठी काम करत आहेत.

चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चे सर्व काम पुणे येथील एम के स्टुडिओ मध्ये झाले आहे, या चित्रपटात रोहित पाटील आणि सोनू साठे या दिग्गज लोकप्रिय गायकांनी गाणे गायले आहेत, तर चित्रपटात पुणे नाशिक येथील कलाकारांनी काम केलेले आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात तब्बल छोट्या-मोठ्या 120 कलाकारांनी काम केले असून त्यात 55 कलाकारांनी संवाद म्हटले आहेत.
चित्रपटात प्राणी दाखवल्यामुळे त्याचे वेगळे सेन्सॉर हरियाणा येथे झाले असून अतिशय संघर्षातून या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.

सामाजिक प्रबोधन करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला असून प्रेक्षकांना या चित्रपटाच्या कथेची भुरळ पडली असून जिथे जिथे हा चित्रपट प्रदर्शित होतो तिथे तिथे केवळ आणि केवळ माऊथ पब्लिसिटी द्वारे प्रेक्षक थिएटरकडे गर्दी करतात हे दिसून आले आहे.

महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये हा चित्रपट पोहोचवायचा आहे त्यासाठी विविध सामाजिक संस्था स्वयंसेवी संस्था राजकीय व्यक्ती जाणकार व्यक्ती तसेच आमदार ,खासदार ,मंत्री ,त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी ,उद्योजक ,कृषी पूरक व्यवसाय करणारे सर्व कर्तृत्व संपन्न व्यक्ती यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन निर्माता निरंजन देशमुख यांनी केले आहे

या चित्रपटाद्वारे निश्चितच शेतकरी मुलांच्या रखडलेल्या लग्नाच्या प्रश्नावर प्रभावीरित्या जनजागृती होऊन निश्चितच सामाजिक क्रांती होईल असे त्यांना वाटते.

:

नवरदेव चित्रपटा चा सकारात्मक परिणाम होताना दिसत असून, अतिशय प्रभावीरित्या शेतकरी मुलांच्या लग्नाच्या समस्येवर प्रबोधन या चित्रपटात केले आहे, त्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून काम करणारे चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक निरंजन देशमुख सातत्याने प्रयत्नशील आहेत, त्यांच्या प्रयत्नांना अधिक गतिमानता देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे कारण हा नवरदेव चित्रपट केवळ चित्रपट न राहता शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर जनजागृती करणारा चळवळीचा एक भाग बनला आहे, डोंगराएवढा नाही परंतु एक मातीचा कण म्हणून जरी या चित्रपटाने सामाजिक परिवर्तन केले तर ती फार मोठी सकारात्मक बाब शेतकरी मुलांच्या उद्याच्या उज्वल भविष्यासाठी राहील यात तीळ मात्र शंका नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button