तंत्रज्ञान
सेट परीक्षेत सौ. अमृता काळे उत्तीर्ण.

सोनई–प्रतिनिधी:-
प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल नुकताच जाहीर झाला सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आलेल्या 37 व्या महाराष्ट्र सेट परीक्षेस राज्यभरातून एकूण 79 हजार 774 उमेदवार बसलेले होते. त्यापैकी 5 हजार 297 (6.64 %) उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
सोनई (ता. नेवासा) येथील सौ. अमृता सचिन काळे ह्या गणित विषय घेऊन एम.एस्सी, बी.एड झालेल्या असून त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन होत आहे. त्या मुळा सहकारी साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी बद्रीनाथ काळे यांच्या स्नुषा आहेत. सेट परीक्षेसाठी त्यांना श्री. ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे (सर) यांचे मार्गदर्शन लाभले. सौ. अमृता काळे यांच्या या यशाबद्दल मुळा उद्योग समूहाचे संस्थापक यशवंतराव गडाख पाटील, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकराव गडाख पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनीताताई गडाख, मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन पा.गडाख, संस्थेचे माजी सचिव डी.टी. गडाख, नेवासा येथील तुकाराम महाराज मंदिराचे मठाधिपती महंत उद्धवजी महाराज मंडलिक, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, व्हाईस चेअरमन कडुबाळ पा. कर्डिले यांनी अभिनंदन केले आहे.