ग्रामीण

लाडजळगाव जि.प.गटातील लोकप्रतिनिधींनी डावललेल्या पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करावी: सौ.काकडे


मृद व जलसंधारण विभाग, नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जि.प.लाडजळगाव गटातील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याबाबतचे निवेदन जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी मा.श्री.राजेंद्र काळे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक यांना आज देण्यात आले.

यावेळी राणेगावचे सरपंच शहादेव खेडकर, उपसरपंच शरद वाघ, वि.का.सो.चे संचालक नवनाथ खेडकर, चंद्रभान खेडकर, उद्धव वाघ, शिवाजी लांडे, आधोडीचे ग्रा.प.सदस्य रामेश्वर पोटभरे, भाऊसाहेब पोटभरे, पांडुरंग गर्जे, भगवान गाढवे हे ग्रामस्थ उपस्थित होते .
निवेदनात पुढे म्हंटले आहे की, शेवगांव तालुक्यातील मौजे राणेगांव येथील कुंडीचा पाझर तलाव, डूकरीचा पाझर तलाव, मौजे आधोडी येथील पाझर तलाव व सालवडगाव येथील पाझर तलावांची परिस्थीती अत्यंत वाईट झाली असून त्यामधून मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत आहे. मागील वर्षी पर्जन्यमान मोठयाप्रमाणावर झाले तरी या पाझर तलावामध्ये पाण्याचा साठा होऊ शकला नाही. कारण पूर्णत: या पाझर तलावांना गळती होत आहे. आधोडी येथील पाणीपुरवठा योजना या तलावावर अवलंबून आहे. शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग हा दुष्काळी पट्ट्यातील असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पाट पाण्याची येथे व्यवस्था नाही. संपूर्ण परिसर हा कोरडवाहू व डोंगराळ आहे. पावसाच्या पाण्यावरच येथील शेती, प्राणीजीवन, मनुष्यजीवन अवलंबून आहे. वरील चारही पाझर तलावाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग अहमदनगर यांचेकडून मृद व जलसंधारण विभाग, नाशिक कार्यालयाकडे पाठवलेली आहे. तरी लाडजळगाव जि.प.गटातील लोकप्रतिनिधींनी डावललेल्या या पाझरतलावांच्या दुरुस्तीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध होऊन पाझर तलावांची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सदरच्या पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधीची तरतूद करावी असेही या निवेदनात म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button