कोतुळ परिसरात गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान नुकसानीचे पंचनामे करावे

कोतुळ दि ७
अकोले तालुक्यात काल सोमवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला
या पावसात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे

सोमवारी सायंकाळी कोतुळ परिसरात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला प्रचंड गारांच्या माराने शेतातील उभे पिके भुई सपाट झाली. कांदा ,मका ,कोबी, टोमॅटो घास यासह भाजीपाला पिकांची मोठी नुकसान झाली कांदा ,गहू हरबरा ,पीक देखील जमीन दोस्त झाली या नुकसानीची शासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख यांनी केली आहे

परिसरात कोतुळ, भोळेवाडी , बोरी, या परिसराला गारपिटचा सर्वाधिक फटका बसला या गारपिटीने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून हातातील पीक वाया गेले आहे या पिकांची भरपाई मिळाली तरच शेतकरी यातून सावरेल अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होईल असे सिताराम पाटील देशमुख यांनी सांगितले