निवडणुकीत मते विकत घेतली जातात हे लोकशाहीचे दुर्दैव — प्रा. एस. झेड .देशमुख

अकोले /प्रतिनिधी
निवडणुका हल्ली खर्चीक बनल्या असून निवडणुकीत मते विकत घेतली जातात हे लोकशाहीचे दुर्दैव आहे.नगरपालिका,पंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या पलीकडे जाऊन झाल्या पाहिजेत असे मत पतितपावन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत प्रा.एस.झेड.देशमुख यांनी केले.स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अद्याप सर्वाना पिण्यासाठी पाणी मिळत नाही हे दुदैव आहे.निसर्ग शुद्ध पाणी आपल्याला देतो आणि सगळ्या नगरपालिका गटाराचे पाणी नदीला सोडतात अशी टीका त्यांनी केली.
जनजाती कल्याण आश्रम उत्तर नगर जिल्हा व अकोले तालुका यांच्या सयुंक्त विद्यमाने बाळासाहेब वडजे, शरद नवले,हितेश कुंभार,नवनाथ शेटे,प्रदीपराज नाईकवाडी, सोनाली नाईकवाडी, प्रतिभा मनकर, शितल वैद्य, वैष्णवी धुमाळ,माधुरी शेणकर, तमन्ना शेख,जनाबाई मोहिते, श्वेताली रुपवते,या अकोले नगरपंचायत च्या नूतन नगरसेवक -नगरसेविका यांचा गृहक वसतिगृह अकोले येथे प्रा.एस.झेड.देशमुख व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जनजाती कल्याण आश्रम चे तालुकाध्यक्ष योगेश देशमुख ,ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रभान टेके, एल आय सी चे विकास अधिकारी वैभव व्यवहारे, जनजाती चे शिक्षा आयाम चे प्रांत अध्यक्ष रामदास सोनवणे, प्रा .विठ्ठलराव शेवाळे,दिलीप शहा,दिनेश शहा,धनंजय संत,अनिल भळगट, परशुराम शेळके, सुधीर जोशी,दिलीप झोळेकर,सविता मुंदडा,सौ.कचरे,सौ.धुमाळ, सौ.टेके आदी उपस्थित होते.
प्रा.एस झेड देशमुख म्हणाले की- आपण व आपली पत्नी सुद्धा संगमनेर नगरपालिकेत नगरसेवक होतो.त्यावेळी निवडणूक लढविण्यासाठी 10 हजाराच्या आत संपूर्ण खर्च यायचा,आताची परिस्थिती मात्र वेगळी आहे.अकोले नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांनी पक्ष विरहित एकदिलाने,धाडसाने, विकासाचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
हभप दीपक महाराज देशमुख यांनी सर्व नगरसेवकांनी आगामी पाच वर्षाच्या काळात जनतेच्या मनातील नगरसेवक बनावे ,त्यादृष्टीने राजकारण विरहित विकासात्मक कामे करावीत असे सांगितले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, ज्येष्ठ नेते ऍड.वसंतराव मनकर,भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ,नगरसेविका सोनालीताई नाईकवाडी यांचीही भाषणे झाली.
प्रास्ताविक व स्वागत जनजातीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी केले.सूत्रसंचालन गणेश जोशी व प्रमोद जोशी यांनी केले.तर आभार जनजातीचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य संतोष कचरे यांनी मानले.