विकास गटकळ यांचा वाढदिवस अनाथालयातील मुलांसोबत साजरा

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष शेवगाव तालुका मीडिया प्रमुख विकास गटकळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपला वाढदिवस उचल फाउंडेशन अनाथ आश्रम येथे मुलांसोबत 3 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला
प्रहार जनशक्ती पक्ष शेवगाव तालुका मिडिया प्रमुख विकास गटकळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उचल फाउंडेशन अनाथ आश्रम इथे खाऊ व फळे वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला.इतर खर्च टाळून बॅनर बाजी न करता समाजापुढे वेगळा संदेश प्रहार जनशक्ती संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विचाराने अनाथ आश्रम येथे बाल मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला.यावेळी उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, शेवगाव -पाथर्डी मतदार संघाचा प्रमुख राम शिदोरे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कुसळकर, महेश घनवट, ऋषी बर्डे,सतीश पवार, कानिफनाथ धुमाळ, इरफान काजी, जावेद शेख, संजय नाचन, कल्पेश दळे, यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.