समाजसेवक अण्णा हजारे , आमदार लंके यांना पाठविले मुगाचे पार्सल !

टँकर घोटाळा प्रकरणी मौन
पाळल्याने लोकजागृतीची गांधीगिरी
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
राज्य विधानसभेच्या चालु असलेल्या अधिवेशनात टँकर घोटाळा प्रकरणी चर्चा चालु असताना पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी कोणतीही भुमिका न घेतल्या मुळे हा घोटाळा उघड करणारी लोकजागृती सामाजिक संस्था यांनी या विषयी नाराजी व्यक्त करत त्यांना मुगाचे पार्सल पाठवून गांधीगीरी केली आहे .
टँकर घोटाळ्यातील आरोपी हे अण्णा हजारे यांच्या गावातील असून त्यांचे सहकारी आहेत . त्यांनीही याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांपासून मौन बाळगले आहे . त्यामुळे त्यांनाही मुग भेट म्हणून पाठवण्यात आले आहेत . ग्रामीण भागात , एखाद्या विषयावर काहीही न बोलणाराला तुम्ही मुग गिळले काय ? अशी म्हण प्रचलित आहे . याचाच आधार घेऊन
लोकजागृती सामाजिक संस्थेने आमदार लंके व हजारेंना मुगाचे पार्सल सप्रेम भेट पाठवले आहे .
पारनेर तालुक्यात सुमारे १०२ कोटी रुपयांचा टॅकर घोटाळा उघड झाला . हा घोटाळा लोकजागृती सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयाच्या मदतीने उघड केला आहे . गेल्या मार्च महिन्यात पन्नास लाखांच्या वन विभागाचा घोटाळा प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी मांडणारे आमदार लंके यांनी टँकर घोटाळा प्रकरणी मात्र काल मौन पाळले होते . विधानसभेत आवाज उठवण्याची मागणीही लोक जागृतीने केली असताना या विषयी त्यांनी चकार शब्द काढला नव्हता . या प्रकरणातील टँकर घोटाळेबाजांना पाठीशी घालुन आमदार महोदयांनी निवडणुकीतील भांडवल पुरवठादारांच्या उपकाराची परतफेड केल्याचा आरोप लोकजागृतीचे
अध्यक्ष रामदास घावटे यांनी आमदार लंके यांच्यावर केला आहे . दि . २२ ऑगस्ट २०२२ रोजी विधानसभेत टॅकर घोटाळ्याशी संबंधीत चर्चा झाली

. बीडचे आमदार संदिप क्षीरसागर, धनंजय मुंडे , नाशिकचे एक आमदार यांनी या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटील यांना धारेवर धरले . परंतु यावेळी पारनेरचे आमदार महोदयांनी मात्र मौन बाळगणे पसंत केले .माझ्या पारनेर तालुक्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे एवढे सुध्दा सत्य सभागृहाला सांगावे वाटले नाही .
पारनेर साखर कारखाना सहा महीन्यात शेतकऱ्यांचा करणार अशी गर्जना करणारे लंके यांनी कारखाना बचाव समितीला धोका दिला . पारनेरला भव्य दवाखाना उभारण्यासाठीच्या जागेला तिथे विरोध झाला असताना पारनेर कारखान्यावर उपलद्ध जागा देण्याच्या बचाव समितीच्या प्रस्तावाला आमदार लंकेंनी केराची टोपली दाखवली . हा प्रस्ताव चांगला ,बरा ,वाईट काहीही प्रतिक्रीया कळवण्यात आली नाही .त्यामुळे पारनेरची मोक्याची जागा हडपण्यासाठी तर हा आटापिटा नाही ना या पारनेरकरांच्या शंकेला पुष्ठी मिळत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे .
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा देशभर डांगोरा पिटणारे थोर समाजसुधारक तथा माहीती अधिकाराचे जनक अण्णा हजारे यांनाच आता माहीती अधिकाराची अॅलर्जी झाली आहे . कारण त्यांच्या सहा संस्था यांची माहीती अपिल करून देखील देण्यात आली नाही . आता राज्य माहिती आयोग यांच्याकडे अपिल दाखल करण्यात आले आहे .त्यामुळे त्यांच्या पारदर्शकतेची व प्रामाणिकपणाची आता कीव येत असल्याची भावना लोकजागृतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली . त्यामुळे आम्ही आमच्या भावना त्यांचेपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांना हा नजराना भेट स्वरूपात पाठवत असल्याचे रामदास घावटे यांनी सांगितले