शब्दगंध साहित्यीक परिषदेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शब्दगंघ साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यच्या शेवगाव तालुका शाखेच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो, या दिनाचे औचित्य साधून शब्दगंध साहित्यीक परिषद शेवगाव शाखेच्यावतीने इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी
१)माझा आवडता कवी २)माझा आवडता स्वातंत्र्य सैनिक ३)ऑनलाइन शिक्षण फायदे आणि तोटे ४)भारताची गानकोकिळा लता मंगेशकर ५)मोबाइल शाप की वरदान ६)एका शेतकऱ्याचे मनोगत असे विषय असून स्पर्धकांनी यापैकी एका विषयावर एक हजार शब्द मर्यादेपर्यंत निबंध स्वहस्ताक्षरात लिहून दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत शब्दगंध साहित्य परिषद द्वारा श्री उमेश घेवरीकर. त्रिमुर्ती एजन्सिज, मार्केट यार्ड समोर शेवगाव. जिल्हा अहमदनगर ४१४५०२ या पत्त्यावर स्वतःचा संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांकासह पाठवावेत. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रु. एक हजार रू.७०० व रू.५०० रोख पारितोषिक तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल , तसेच उत्तेजनार्थ पाच स्पर्धकांना रु २०० व प्रमाणपत्र देऊन राजभाषा दिनी गौरविण्यात येईल अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषद शेवगाव शाखाध्यक्ष हरिभाऊ नजन यांनी दिली.