इतर

‘नवरदेव’ हा मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारा चित्रपट आहे -निर्माता निरंजन देशमुख

मराठी चित्रपटाला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी धडपड

शासनाचे मराठी चित्रपटाला अनुदान मिळावे म्हणून केवळ नियम व अटी पुर्ण करण्यासाठी मी चित्रपट निर्माण केला नसुन खऱ्या अर्थाने तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कसा जाईल या साठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन नवरदेव चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक निरंजन देशमुख यांनी महादर्पण पोर्टल न्यूज शी बोलताना सांगितले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून नवरदेव चित्रपट हा मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारा कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट आहे.
शासनाचे अनुदान मिळावे म्हणून जरूर तो पाच महसूल विभागातील दहा थेटर मध्ये प्रदर्शित होणार आहे परंतु केवळ अनुदान मिळावे म्हणून औपचारिता पुर्ण केली जाणार नाही तर जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट कसा पोहचेल आणि मराठी चित्रपट पुन्हा एकदा सह कुटूंब सह परिवार कसा बघेल या साठी मी प्रयत्नवादी असल्याचे निरंजन देशमुख यांनी सांगितले आहे.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड येथील यात्रेत तमाशा प्रमाणे सुपारीवर चित्रपटाचे आयोजन यात्रा कमिटीने करून विनामूल्य असंख्य प्रेक्षकांना चित्रपट दाखविण्यात आला. शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या नवरदेव चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात केवळ शेतकरी मुलांच्या लग्नाच्या प्रश्नावर जनजागृती केली नाही तर विविध जातींमधील कर्तुत्व संपन्न तरुण मुले की जे उद्योग व्यवसाय करतात त्यांची सुद्धा लग्न जमत नाहीत त्यावर प्रभावी भाष्य या चित्रपटात करण्यात आले आहे
हा चित्रपट केवळ चित्रपट न राहता शेतकऱ्यांची चळवळ म्हणूनच विधायक काम करत असल्याचे निरंजन देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यात्रा आणि जत्रेत चित्रपटाचे आयोजन करण्यात आल्याने या निमित्ताने प्रेक्षकांच्या मोबाईल ला किमान तीन तास पुर्ण पने विश्रांती मिळून सह कुटूंब सह परिवार या निमित्ताने एकत्र बसून चित्रपटाचा आनंद घेऊ शकत आहे आणि त्यांच्यात सकारात्मक बदल हा चित्रपट घडवत आहे याचा आनंद मला पैशापेक्षा फार मोठा आहे असे निरंजन देशमुख यांनी प्रामाणिकपणाने सांगितले आहे.
कॉलेजच्या विद्यार्थिनी, घरकाम करणाऱ्या महिला भगिनी, शेतात काम करणाऱ्या महिला भगिनी, नोकरदार वर्ग, व्यापारी, शेतकरी बांधव, तरुण मुले आणि युवक सर्वांना चित्रपट खुप आवडत आहे ही माझ्यासाठी खूप आशादायक बाब आहे असे देशमुख यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे सर्व नवीन कलाकार असताना देखील प्रत्येक वेग वेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या भागात की जिथे आम्हाला कुणी चुकूनही ओळखत नाही, तिथे सगळीकडे या चित्रपटाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे, आणि चित्रपट संपल्यावर बघावयास आलेले प्रेक्षक आनंदाने चित्रपटाबद्दल भरभरून उत्स्फूर्तपणे बोलतात आणि मला दुसऱ्या दिवशी सुद्धा अनेकांचे फोन येतात चित्रपट खुप छान झाला आहे असे म्हणतात त्या वेळी मला खूप आनंद होतो तो आनंद पैशांच्या फुटपट्टीने मोजता येणार नाही असे निरंजन देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button