इतर
ऍड उषा पगारे यांचा वाढदिवस जलाराम आश्रमात साजरा

नाशिक प्रतिनिधी – डॉ शाम जाधव
नाशिक दि. २६ ॲडव्होकेट उषा पगारे( मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन कायदेशीर सल्लागार )यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात जलाराम मतिमंद निवासी शाळा, तवली फाटा पेठ रोड मखमलाबाद येथे साजरा करण्यात आला.

आश्रमातील मुलांना नाश्ता, बिस्कीट व शैक्षणिक साहित्य वाटप करून केक कापण्यात आला.
यावेळी मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन तर्फे स्त्री शक्ती अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. मा मनिष मुथा, सौ ज्योती परदेशीं, सौ रेखा काकड, आणि डॉ संदीप काकड व आदी पदाधिकारी उपस्थित होते.