इतर
पाडळीत पंधरा एकर ऊस क्षेत्र जळाले ,

पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे काल भर दुपारी उसाचे शेत पेटले विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली विजेच्या तारेवरू न आगीचे लोळ पडल्यामुळे ,उसाने पेट घेतला , आणि काही वेळात आगीने रौद्र रुपधारण केले, वृद्धेश्वर साखर कारखानाच्या आग्निशामक गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला या आगीत बबनराव बांगर,,मनकर्णा फुंदे, बाळासाहेब बांगर, बापु बांगर, संजय बांगर, साहेबराव बांगर, सीताराम बांगर,, धोंडीराम बांगर, धोंडीराम गर्जे, आसाराम बांगर, सुखदेव बांगर, सुखदेव भाऊ गर्जे या शेतकऱ्यांचे उसाचे पीकाचे मोठे नुकसान झाले आहे