पैठण च्या उजव्या कालव्यात कार चा अपघात, सहा जखमी

;
गणेश ढाकणे
गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन (शनीचे) रोडवरील पैठणच्या उजव्या कालव्यात भरधाव वेगातील कार पडली. यामध्ये कारमधील सहा जण जखमी झाले.
जखमींना गेवराईचे स्थानिक नागरिकांनी कारच्या बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हि घटना आज शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
, राक्षसभुवन शनीचे येथे दर्शन घेऊन हे भाविक औरंगाबाद येथे परत जात असताना भरधाव वेगातील कार (क्र.MH-20 FY 3302) हि या रोडवरील पैठणच्या उजव्या कालव्याजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कालव्यात कोसळली. यामध्ये कारमधील सहा जण जखमी झाले असून हा अपघात घडला तेव्हा तहसीलदार सचिन खाडे हे गेवराईकडे येत होते. त्यावेळी त्यांनी व स्थानिक नागरिकांनी कारमधील जखमींना मदत करत कारच्या बाहेर काढले. तसेच या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. यानंतर अपघातग्रस्त कार ट्रँक्टरच्या सहाय्याने वर काढण्यात आली .
पैठणच्या उजव्या कालव्यात मागील काही दिवसांपासून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे हा कालवा भरुन वाहत होता. दरम्यान कालच या कालव्यातील पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणातून बंद करण्यात आला होता. त्यामुळे कालव्यातील पाणी आज सकाळी कमी झाले होते. दरम्यान आज शनिवारी दुपारी सदरील कार कालव्यात पडली. अपघातग्रस्तांचे नशीब बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कालव्यात जर पाणी असते तर यामध्ये जीवित हानी झाली असती
