अहमदनगर

देव हा प्रत्येकाच्या अंतरंगात मात्र त्याला बाहेर शोधत फिरतो – ह.भ.प .सुनिता कातोरे .

नेप्तीत किर्तनाला कडाक्याच्या थंडीत भाविकांचा मोठा प्रतिसाद

आहिल्यानगर – “देव हा प्रत्येकाच्या अंतरगांत असून आपण मात्र त्याला बाहेर शोधत फिरतो. मन निर्मळ ठेवलं, विचार पवित्र ठेवले तर देवदर्शन हे घरबसल्या घडतं,” असे प्रतिपादन ह.भ.प .सुनिता कातोरे त्यांनी केले.

नगर तालुक्यातील नेप्ती येथे दत्त जयंती उत्सव काही कारणाने दि. ११ डिसेबरला साजरा करण्यात आला .या उत्सवाचे आयोजन आसाराम मारुती जपकर, उपसरपंच एकनाथ आसाराम जपकर, संतोष आसाराम जपकर यांच्या वतीने करण्यात आले होते. या उत्सवात ह.भ.प. सुनीताताई कातोरे यांच्या भव्य कीर्तनाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
महाराजांच्या प्रभावी किर्तनाने कार्यक्रमस्थळी भाविकांच्या गर्दीत शांतता आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. दत्त जयंतीचे औचित्य साधत त्यांनी दत्तात्रेयांच्या तत्वज्ञानाची सखोल मांडणी करत आत्मपरिचय, साधना आणि सत्संगाचे महत्त्व स्पष्ट केले.


कार्यक्रमाला महिला-पुरुषांसह तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग होता. किर्तनाला कडाक्याच्या थंडीत सुद्धा भाविकांची मोठी गर्दी केली होती. मार्गदर्शन मनापासून ऐकून मोठ्या उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने प्रतिसाद दिला. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी सरपंच संजय आसाराम जपकर ,उद्योजक संजय अशोक जपकर, माजी सरपंच विठ्ठल जपकर, सरपंच सविता संजय जपकर, रामदास फुले, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे ,फारूक सय्यद ,दादू चौगुले, संभाजी गडाख, अशोक जपकर, बंडू जपकर, बाबासाहेब होळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजी होळकर,नंदू जाधव, माजी चेअरमन विलास जपकर, मल्हारी कांडेकर, राजेंद्र जपकर, अंबादास जपकर, अशोक जपकर, राजाराम जपकर, भाऊसाहेब होळकर, उमर सय्यद, चेअरमन सुरेंद्र होळकर, सुरेश कदम, सादिक पवार, मच्छिंद्र होळकर, ज्ञानेश्वर जपकर, कारभारी जपकर, देवा होले, माजी सरपंच दिलीप होळकर, सोमनाथ जपकर, प्रा. एकनाथ होले ,अतुल जपकर, निखिल जपकर, अतुल गवारे, देवराम जपकर, राजेंद्र जपकर, भैरवनाथ जपकर, जमीर सय्यद, जावेद सय्यद, नितीन कदम,भास्कर जपकर, बाबासाहेब जपकर, मच्छिंद्र जपकर, केशव जपकर, दादाभाऊ जपकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कांडेकर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button