अकोले तालुक्यात आदिवासी भागातील शेतकऱ्यांना शासनाने भात पीक नुकसान भरपाई द्यावी- राजेंद्र सोनवणे

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात आदिवासी भागात तील शेतकऱ्यांना भात पीक नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी अकोले तालुका आरपीआयचे भंडारदरा विभाग प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी केली आहे
अकोले तालुक्यातील घाटघर भंडारदरा परिसरात गेल्या 15 मे पासून पाऊस पडत आहे सततच्या पावसाने भात रोपांची प्रचंड नुकसान झाली आहे भात लागवडीसाठी टाकलेली रोपे सडून गेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे
भात लागवडी कशा कराव्यात असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे जे थोडेफार रोप वाचली आहे ती रोपे पिवळी पडली आहे भात रोपे पिवळी पडल्याने लागवडी योग्य राहिली नाही तालुक्यात पुरेसा युरिया खते उपलबद्ध नसल्याने शेतकरी पिवळी रोपे वाचवीण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे
आदिवासी भागात शेतकऱ्यांचे भात रोपे वाया गेल्याने शेतकऱ्यांनां शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आरपीआय चे भंडारदरा विभाग प्रमुख राजेंद्र सोनवणे यानी केली आहे