आजचे पंचांग व राशिभविष्य दि १४/०२/२०२२

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २५ शके १९४३
दिनांक :- १४/०२/२०२२,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२८,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति २०:२९,
नक्षत्र :- पुनर्वसु समाप्ति १९:५३,
योग :- आयुष्मान समाप्ति २१:२८,
करण :- कौलव समाप्ति ०७:३९,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – धनिष्ठा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:५९ ते ०८:२५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:५१ ते ११:१७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३६ ते ०५:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०२ ते ०६:२८ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
भौमप्रदोष, कल्पादि, घबाड ११:५३ नं. २०:२९ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २५ शके १९४३
दिनांक = १४/०२/२०२२
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
घरात नातेवाईक गोळा होतील. दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल.
वृषभ
व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल. चातुर्याने व्यवहार कराल. आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. फायद्याकडे लक्ष द्यावे.
मिथुन
चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल. प्रगल्भ लिखाण कराल. धोरणीपणे वागणे ठेवाल. शिस्तीचा फार बडगा करू नये.
कर्क
दिवस स्वच्छंदीपणे घालवाल. अतिविचार करू नयेत. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल. आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल.
सिंह
छुप्या शत्रूंवर जय मिळवता येईल. विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. बौद्धिक कामात गती येईल.
कन्या
जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करावा. नसत्या गोष्टीत अडकू नका. दिवस आळसात जाईल. स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. पैशाचा योग्य विनिमय करावा.
तूळ
नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. हातात नवीन अधिकार येतील. पराक्रमाला अधिक बळ मिळेल. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील. भावंडांशी मतभेद संभवतात.
वृश्चिक
तुमचा मान वाढेल. हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. हित शत्रूंवर मात करता येईल.
धनू
आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. चिंतन करण्यात वेळ घालवाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नवीन गोष्टी जाणून घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करता येईल.
मकर
शांत व स्थिर विचार करावा. आवक-जावक यांचा मेळ घालावा. अनाठायी खर्च टाळावा. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. धार्मिक यात्रेचे आयोजन करावे.
कुंभ
कामात तत्परता दाखवाल. सर्व गोष्टी उत्तमरीत्या जाणून घ्याल. जास्त चिकित्सा करू नका. हटवादीपणा करू नये. हजरजबाबीपणा दाखवाल.
मीन
कागदपत्रे जपून ठेवावीत. घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वतंत्र वृत्ती दर्शवाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर