जनशक्तीच्या पाठपुराव्याने ग्रामीण भागात लालपरी धावली.

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची होणारी हेळसांड थांबवून ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत करा अन्यथा जनशक्ती ठोस भूमिका घेईल अशा आशयाचे निवेदन जनशक्तीच्या वतीने जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आगार व्यवस्थापक श्री.वासुदेव देवराज यांना दि.०३ रोजी देण्यात आले होते. या मागणीला आज यश आले
ग्रामीण भागात आजपासून लालपरी धावली आहे. जनशक्तीच्या मागणीनुसार ग्रामीण भागातील बस सुरु केल्याने जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जनशक्ती उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष श्री.अशोकराव ढाकणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक श्री.वासुदेव देवराज, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर मुरदारे यांच्यासह बस चालक व वाहकांचे शाल श्रीफळ घालून सत्कार करून बसची पूजा केली. यावेळी अकबरभाई शेख, संभाजी टाकळकर, राजेंद्र मंचरे, कृष्णा सरोदे, झिरपे पांडुरंग, संतोष रुईकर, आकाश गोरे आदि यावेळी उपस्थित होते.