परीचारीकेच्या मृत्यु प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.!

यवतमाळ दि 15
प्रशिक्षणार्थीं परीचारीकेच्या मृत्यु प्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे
तुपटाकळी येथील रहिवासी असलेल्या निकिता कैलाश राऊत या प्रशिक्षणार्थी चा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित विभागाच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आज शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे
यामुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली या बाबत प्राप्त माहितीनुसार तुपटाकळी येथील निकिता कैलास राऊत ही यवतमाळ येथे शासकीय रुग्णलयांमध्ये असणाऱ्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रामध्ये 2022 ला प्रवेशित होती सदर प्रशिक्षणार्थी वसतिगृहात असताना अचानक पणे चार दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली प्रशानाच्या दिरंगाई आणि दुर्लक्षित पणामुळे सदर परीचारीकेचा अंगामध्ये ताप भरला व तिची तब्येत बिघडली असे असतानाही सदर वसतिगृहाची असणारी वॉर्डन यांनी कुठल्याही प्रकारची सूचना तिच्या नातेवाईकांना दिली नाही तब्येत जास्त बिघडल्यावर दि 5 रोजी दुपारी तीन च्या दरम्यान कॉल केला आणि आपल्या मुलीची तब्येत जास्त बिगडली आहे तिला घेऊन जा अशा प्रकारचा मेसेज दिला रोज मजुरी करणाऱ्या वडीलासमोर याचा प्रश्न उभा राहिला आणि थोड्या वेळानंतर कळले की अतिदक्षता विभागात निकिताला भरती करण्यात आले वडील शासकीय रुग्णलयांमध्ये येईपर्यंत निकिताची प्राणज्योत मावळली होती तिच्या मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार वडीलांनी केली आहे