आजचे पंचांग व राशिभविष्य दि १७/०२/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २८ शके १९४३
दिनांक :- १७/०२/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३०,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २२:४१,
नक्षत्र :- मघा समाप्ति १६:११,
योग :- अतिगंड समाप्ति १९:४६,
करण :- बालव समाप्ति १०:३७,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – धनिष्ठा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:१० ते ०३:३६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:५७ ते ०८:२४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:४३ ते ०२:१० पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:१० ते ०३:३६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०३ ते ०६:३० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा ४ दिवस, इष्टि,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २८ शके १९४३
दिनांक = १७/०२/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
आज कौटुंबिक आनंद असेल. मांगलिक कार्यात किंवा समारंभात सहभागी होऊ शकता. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय असेल. कामासाठी दिवस चांगला आहे, मन उत्साहाने भरलेले असेल.
वृषभ
आज व्यापारी वर्गाला विशेष चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे धनलाभ होऊ शकतो. स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांनी प्रयत्न करणे सोडू नये.
मिथुन
आजचा दिवस उत्साहात जाईल. मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील. आज तुम्ही कौतुकास्पद काम कराल. आज तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
कर्क
आजचा दिवस शुभ असेल. कामात यश मिळेल तसेच लाभदेखील होईल. आज तुम्ही कौतुकास पात्र असाल. वैवाहिक जीवनात गोडवा असेल. कुटुंब किंवा प्रियकरांसोबत चांगला वेळ जाईल.
सिंह
आजचा दिवस चांगला जाईल. अंगी चपळता येईल. व्यवसायात लाभ होईल. नोकरीची स्थिती चांगली असेल. आज इच्छित फळ मिळेल. तुम्ही सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा आनंद घ्याल.
कन्या
आजचा दिवस खूप खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कामात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते. परदेशी संबंधांमुळे मोठे फायदे होतील आणि भागीदारीला देखील सुरुवात होईल.
तूळ
आज हुशारीने कामात यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कामाच्या योजना पूर्ण होतील. कौटुंबिक सुख लाभेल. कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असू शकते, परंतु तुम्हाला कौशल्याने आलेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदात जाईल. तुमच्या ज्ञानात वृद्धी होईल आणि विचारात दृढता येईल. संभाषण कौशल्य वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर संबंध सौहार्दपूर्ण असतील.
धनु
आजचा दिवस शिक्षणासाठी चांगला आहे. मेहनतीनुसार यश मिळेल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. आनंददायी प्रवास संभवतो.
मकर
तुमच्या कार्यक्षेत्रात प्रभाव राहील. धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. या दिवशी चपळाईने तुम्ही तुमचे प्रत्येक काम अगदी सहजतेने पूर्ण कराल. छुप्या शत्रूंपासून सावध राहा अन्यथा ते तुमचे नुकसान करू शकतात.
कुंभ
आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. कर्ज म्हणून दिलेले पैसे परत मिळतील. कामासाठी आजचा दिवस उत्तम असेल. .
मीन
शुभ कार्यासाठी आजचा दिवस शुभ असेल. मन प्रसन्न राहील. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला कोणालातरी भेटण्याची संधी मिळेल. आज नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरेल. आज तुमची न्यायालयीन खटल्यातून मुक्तता होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर