दहिगाव ने शाळेत साजरा झाला शिवजन्मोत्सव सोहळा

शेवगाव (जि अहमदनगर)–
जि.प.प्रा.शाळा दहिगाव ने येथे शिवजन्मोत्सव सोहळा अप्रतिम उत्साहात साजरा करण्यात आला.
उत्साहाने सळसळणारी ऊर्जा घेऊनच जणू प्राथमिक शाळेतील बालचिमूरड्यांनी शिवजयंती साजरी केली.
दरम्यान शिवजन्म पाळणागीत, दैवत छत्रपती,एकच राजा इथे जन्मला, तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्माला इत्यादी गीतांवर मुलामुलींनी उत्कृष्ट सादरीकरण केले.प्रभातफेरीदरम्यान लेझीम पथकाने केलेल्या सादरीकरणाला ग्रामस्थांनी छान प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.या कार्यक्रमातून आपला दैदिप्यमान इतिहासच विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर उभा राहिला.
शिवजयंती सोहळ्यादरम्यान श्री.सचिन चव्हाण, श्री.रामभाऊ काळे, श्री. राहुल फलके , श्री.अस्लम शेख, श्रीम. अर्चना तनपुरे,केंद्रप्रमुख श्री.ज्ञानेश्वर जाधव, पत्रकार व स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुका युवक कार्याध्यक्ष श्री.प्रविण भिसे आदींनी रोख स्वरूपात पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

श्री.रामभाऊ सोनवणे, मुस्लिम अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष श्री.बशीरभाई शेख, श्री.राजुभाऊ सोनवणे, श्री.अंबादास गर्जे, श्री.शंकर पाऊलबुधे आदींनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले
मुख्याध्यापक श्री.राजेश खंडागळे, श्रीम.संगिता भुसे, श्रीम.राजश्री खंडागळे, श्री.मनोहर बैरागी,श्रीम. रत्ना वैष्णव, श्री.संतोष वाघ,श्रीम.मीरा डमाळे, श्रीम.कविता बामदळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
