रांजणी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

शेवगाव प्रतिनिधि
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
गयावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन व त्यानंतरच पहिली ते चौथी मुला मुलीचे शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा त्यांनी राष्ट्र निर्माण करण्यासाठी केलेले कार्य विविध जातीमध्ये विखुरलेला समाज राष्ट्रीय भावनेने जोडून श्रीराम प्रभुंचा प्रजासाठीचा राज्यकारभार व परकिय शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांची युद्ध नीती वेळप्रसंगी गणीमिकावा प्रजा हितासाठी काही वेळेस तह करणे असे महाराजांचे अष्टपैलू नेतृत्व सांगून भाषणे केली व जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे एवढ्या लहान वयात त्यांचे गुरुजींना आई-वडील त्यांच्या संस्कृत संस्कारातून घडते त्यामध्ये शाळेतील शिक्षकाचा वाटा 90 टक्के आहे अशा प्रकारच्या आपल्या भारत भूमीतील राजे-महाराजे थोर विचारवंत समाजसेवक स्वातंत्र्यसैनिक यांच्या जयंती साजरी या शाळेत करतात यामधून मुलांना आपल्या देशाविषयी या थोर पुरुषांच्या समाजहीताची माहिती होते हे कार्य करणार्ये गरुजण मुळ पाया आहे असे प्रतिपादन शरद पा .थोटे यांनी आपल्या भाषणात सांगीतले. छत्रपती हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे संपुर्ण हिंदुस्थानचे एक आदर्श राजे होते .ते एक युगपुरुष आहे .असे प्रतिपादन मुख्याध्यापक बशीर शेख यांनी केले पद्माकर घुले यांनी महाराज आणी त्यावेळेसचे समाज हितासाठी काही कार्य हे विस्ताराने आपल्या भाषणात सांगीतले. अनिल पवार यांनी शिवाजी महाराज याचे कार्याची थोरवी आपल्या भाषणातून विषद केली व गूरुजणाचे आभार माणले. यावेळेस उपस्थित अरुण थोरात,सुभाषराव घुले, पुजांराम पा थोरात, कचरु पा चव्हाण, मनिषाताई घुले ( विद्यमान सरपंच), चव्हाण मावशी ,राजेंद्र नेव्हल ( शाळा पालक समीती अध्यक्ष),भाऊसाहेब मुळे,स्वामी शिदोरे ,संदीप पाटील थोरात ज्ञानेश्वर पा मोरे (शाळा समीती उपाअध्यक्ष ),रविंद्र घुले,पंकज शिदोरे ,बाळासाहेब घुले,आदी मान्यवर उपस्थित होते