खांडवी शिवजन्मोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन व प्रेरणा देणारा सोहळा……

गणेश ढाकणे
गेवराई प्रतिनिधी
मौजे खांडवी येथे सार्वजनिक जंयती उत्सव समितीच्या वतीने “शिवजन्मोत्सव सोहळा २०२२” मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला जयंती दिनी विविध सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम घेऊन शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा व उर्जा देण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेरींग निर्माण करण्याचे कौतुकास्पदकार्य सार्वजनिक जंयती उत्सव समितीच्या माध्यमातून जंयती दिनी करण्यात आले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी “सांस्कृतिक कार्यक्रम” जयंती निमित्त घेण्यात आला यामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहन पर व उत्तेजेनार्थ प्रथम, द्वितीय,तृतीय व चतुर्थ असे विद्यार्थी निवड करण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक कु. समृद्धी बाळु सोनवणे द्वितीय क्रमांक कु.कुमकुम किशोर भोले,प्रज्ञा विकास भोले तृतीय क्रमांक कु.धनश्री तात्याराम शिंदे, तेजस्वीनी उत्तम शिंदे तर चतुर्थ क्रमांक कु.रिया शिवराज सुरवसे या विद्यार्थ्यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमासाठी डॉ शरथ नाईकवाडे,किरण सर गायकवाड,श्याम शिंदे, अविनाश सुरवसे,गणेश जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती जयंतीनिमित्त किरण गायकवाड सर यांचे विशेष सहकार्य लाभले शिव जन्मोत्सव सोहळा २०२२साठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम नाईकवाडे प्रास्ताविक अमोल शिंदे तर आभारप्रदर्शन अमर नाईकवाडे यांनी केले कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते