सुगाव येथील महात्मा फुले विद्यालयात शिवजयंती सोहळा संपन्न

अकोले प्रतिनिधी
— येथील श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले विद्यालय सुगाव बु येथे विविध स्पर्धांचे आयोजन करत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
. विद्यालयात विद्यार्थ्यांनी केलेली सजावट , स्टेजच्या आजूबाजूला सुयोग्य पध्दतीने भगव्या झेंड्याची केलेली सजावट , काही विद्यार्थिनींनी केलेली पारंपारिक वेशभूषा व मोठ्या संख्येने वक्तृत्व स्पर्धा , गीतगायन स्पर्धा , निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवत हा शिवजयंती सोहळा आगळावेगळा केल्याने पालकांसह विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या मर्यादांमुळे सर्वत्र भितीचे वातावरण असतांना , यावर्षी मात्र सर्व निर्बंध शिथिल झाल्याने विद्यालयाचे प्रांगणात विदयार्थ्यांसह सर्वांच्याच चेहऱ्यावर कमालीचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत कार्यक्रमाची रंगत वाढवत असल्याचे दिसून आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सिताराम पथवे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग सांगत मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका नंदा गोपाळे , नंदा नाईकवाडी , क्रीडा शिक्षक दत्तात्रय घुले , दिनेश चव्हाण , योगिता गोरे , सचिन नवले, संजय गुगळे , रामनाथ उगले यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पाचपुते यांनी केले तर अनिल फोडसे यांनी आभार मानले .