गरजूंना धान्याची मदत करून साजरी केली शिवजयंती

गणेश ढाकणे
गेवराई प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेतील सर्व विद्यार्थी कडून गरजुंना मदत करणाऱ्या संघर्ष धान्य बॅंकेला सडळ हाताने धान्य रूपी मदत करुन शनिवार दि.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली
अध्यक्षस्थानी श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय शाळेचे सचिव गोपीनाथराव घुले तर प्रमुख पाहुणे म्हणून संघर्ष धान्य बँक गेवराईचे संचालक शिवाजी झेंडेकर, पसायदान सेवा प्रकल्प या अनाथ मुलाच्या सेवा प्रकल्पाचे संचालक गोवर्धन दराडे, वृद्धा कळसंबरच्या प्रमुख श्रीमती मनिषा पवार , गेवराई पोलिस उपनिरीक्षक अर्चना भोसले, धर्मराज करपे, माजी सरपंच जनार्धन चितळकर, माजी सरपंच सखाराम मुगूटराव, शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले, वसंतराव नाईक वस्तिगृह गेवराईचे अधिक्षक आण्णासाहेब घुले, ग्रामपंचायत सदस्य आप्पा सगळे, ग्रामपंचायत सदस्य शाम साळवे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळीअध्यक्ष संस्थेचे सचिव गोपीनाथ घुले सर तर प्रमुख अतिथी याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी मधुन तृप्ती जगताप, योगिता सगळे, अस्मिता मुगुटराव, आदिती नाईक, सानिका अंबाडे, मुस्कान शेख, वंदना माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शरद माळी यांने पोवाडा तर आदिती नाईक, शालू माळी, रेखा माळी व मंगल कुराडे यांनी एक गीत सादर केले. प्रमुख पाहुणे धर्मराज करपे यांनी विद्यार्थ्यांना सर्वश्रेष्ठ राजा माझा शिवाजी राजा हाच कसा हे सांगितले तर पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी विद्यार्थ्यांनी परिस्थितीची तमा न बाळगता कठीण परिश्रम करून पुढे चालावे असा संदेश दिला. तर श्रीमती मनिषा पवार यांनी माता-पिता व शिक्षक यांचा आदर करावा हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. आपल्या मनोगतातून व्यक्त केला व अनेक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल विद्यार्थिनींचे कौतुकही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले यांनी केले व अध्यक्षीय समारोप संस्थेचे सचिव गोपीनाथराव घुले म्हणाले की, ढोल ताश्याच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते परंतु शाळेत घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी सचोटी शिस्त सातत्य व माता-भगिनी विषयी आदर हे गुण शिवरायांकडून शिकावे असे सांगितले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भूमिका व व गोरगरीब गरजूंना आपल्या घासातील घास देऊन एक सामाजिक बांधिलकीचे मूल्य अंगी रुजावे म्हणून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या परीने पाच किलो 10 किलो 20 किलो असे विविध प्रकारचे धान्य गोळा केले व अनाथालय वृद्धाश्रमाला ते दान दिले या उपक्रमाद्वारे अतिशय चांगले मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजले गेले असे संपूर्ण गावकरी याचे कौतुक करत होते. कोरोना परिस्थिती पाहता या संघर्ष धान्य बॅंकेने गरजु लोकांना धान्य रूपी सहकार्य केले. तसेच या संघर्ष धान्य बॅंकेकडून अनेक निराधार व गरजुंना धान्य रूपी सहकार्य करुन त्यांची उपजीविका भागवली जाते. त्यांना एक मदतीचा हात म्हणून हा शाळेतून उपक्रम हाती घेतला असल्याचे मत यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर येवलेकर यांनी केले.तर आभार श्रीमती अंजली माने यांनी व्यक्त केले. यावेळी रामेश्वर जगताप, उत्तमराव जगताप, नाईक मामा व सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक भागवत सोळुंके, अंजली माने, मुक्ताबाई मोटे, नवनाथ घुगे, हरीभाऊ आघाव, वर्षा कांडेकर, योगेश म्हैसनवाड, शिवाजी पवार, गोरख साकळे, बाबासाहेब कांबळे, ज्ञानेश्वर बास्टे आदींनी सहकार्य केले.