वासुंदे येथील मुख्याध्यापक गीताराम जगदाळे यांचे निधन

पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील वासुंदे येथील रहिवाशी श्री. गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे संचालक संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गिताराम भागाजी जगदाळे यांचे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मंगळवार दि. २५ जून २०२४ दुपारी ३ वाजताच्या उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.
प्रगल्भ विचारसरणी कडक शिस्तीचे मुख्याध्यापक गिताराम भागाजी जगदाळे यांचे अचानक निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गीताराम जगदाळे हे नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असायचे वासुंदे येथे स्थापन करण्यात आलेल्या गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे ते संस्थापक संचालक होते तसेच ते शिक्षक संघटनेमध्ये ही सक्रिय होते. शिक्षक बँकांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. जिल्हा परिषद शिक्षक म्हणून ते आदर्श शिक्षक होते त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले. परिसरामध्ये एक प्रेमळ व्यक्ती म्हणून ते सर्वांना परिचित होते.