आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शुभहस्ते खरवंडी कासार सोसायटी इमारतीचे उदघाटन !

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील: खरवंडी कासार येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटी नवीन इमारत उद्घाटन समारंभ आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले
बरेच दिवसापासून पडझड झालेल्या सोसायटीच्या इमारतीचे अखेर नवीन बांधकाम करून आज दिनांक 22 या दिवशी शेवगाव पाथर्डी च्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजीव राजळे समवेत सहाय्यक निबंधक सौ भारती काटुळे ,तालुका विकास अधिकारी सुभाषराव वांडेकर, सरपंच प्रदीप पाटील ,सभापती सुनीता गोकुळ दौंड यांच्या शुभहस्ते या इमारतीचे उद्घाटन समारंभ करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आमदार मोनिकाताई राजळे यांना देऊन सुसज्ज असा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी खरवंडी परिसरातील विविध गावातील गावकऱ्यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले
यावेळी खरवंडी कासार, मालेवाडी, भारजवाडी, जवळवाडी, ढाकणवाडी, काटेवाडी, तुळजवाडी, ढगेवाडी, किर्तनवाडी, या गावातील सेवा सोसायटीचे चेअरमन व संचालक व सर्व सभासद ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होते
यावेळी बोलताना चेअरमन वामनराव किर्तने म्हणाले की ही जी वास्तू आहे शेतकरी सभासद वर्गांना सुपूर्द केली असून सभासदांच्या ताब्यात दिली आहे यावेळी त्यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांचे सर्व सेवा सोसायटी चेअरमन संचालक व सर्व सभासद यांनी आभार व्यक्त केले कारण की त्यांनी दिलेला शब्द पूर्णपणे पाळत आज सर्व सभासदांच्या समोर साध्य केलेला आहे पूर्वी जी बाजीराव पाटलांनी सेवा सोसायटी ची इमारत केली होती आणि त्या वस्तू पासून कालिका मंदिरापर्यंत जाण्यासाठी गावात जाण्यासाठी जो रस्ता होता तो रस्ता फार खराब होता व ही सोसायटीची इमारत इतकी जीर्ण झाली होती की त्या रस्त्याच्या कडेला कधी कोसळेल याचा भरवसा नव्हता त्यामुळे आमदार यांच्या सहकार्याने हि इमारत उभी राहिली
अहमदनगर जिल्ह्यातील सहकार बँक आशिया खंडात पुरस्कारीत असून परंतु सोसायटीमध्ये कसल्या प्रकारची प्रगती नसून सोसायटीत याच ठिकाणी आहे सभासदांना 50 टक्के लाभांश देऊ असे आश्वासन दिले होते परंतु कोणत्याही सभासदांना याचा लाभ न मिळाल्याने सभासद वंचित राहिले आहेत यावेळी सखाराम दादा खेडकर म्हणाले.
यावेळी कार्यक्रमासाठी भाजपा तालुका अध्यक्ष माणिक मामा खेडकर चिंचपूर चे सरपंच धनंजय बडे भाजपा जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रशीद भाई तांबोळी , महादेव अण्णा जायभाये, गहीनाथ ढाकणे सर, माजी सरपंच अंकुशराव कासुळे भारजवाडीचे सरपंच माणिक बटुळे, उपसरपंच सुनील ढाकणे सर प्रकाश शेठ कटारिया, चंदु शेठ कटारिया, दत्तू नाना पठाडे, बापुराव पठाडे, रामभाऊ गजेऺ, महेश बोरुडे, योगेश आंदुरे, पप्पू केकान, अशोक जायभाये, आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक बाळासाहेब गोल्हार यांनी केले व आभार सोमनाथ आंदुरे यांनी मानले.