इतर

ढाकणवाडी येथील आदित्य ढाकणे याची MBBS,MD पदवी पूर्ण

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील आदित्य महादेव ढाकणे या युवकाने एमबीबीएस डिग्रीसाठी फिलीपाईन्स या देशामध्ये आपले एम बी बीएस एमडी शिक्षण दवावो मेडिकल स्कूल फाऊंडेशन या College मध्ये
M D (Doctor of medicine)हा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला

शिक्षण पूर्ण करून तो आपल्या मायभूमीत भारतामध्ये नुकताच परतला .त्याचे पाथर्डी तालुका व भगवानगड परिसर यांच्याकडून स्वागत करण्यात आले त्याचे बालपणीचे शिक्षण पाचवी ते दहावी अहमदपूर व दहावी ते बारावी श्री संत भगवान बाबा कॉलेज खरवंडी या ठिकाणी झाले त्याचे यशाची सुरुवात भगवानगड परिसरातून झाली तो फिलिपाईन्स वरून आल्यानंतर लगेच भगवानगडावर जाऊन संत भगवान बाबा च्या समाधीचे दर्शन घेऊन न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचा आशीर्वाद घेतला पुढील काही शिक्षणासाठी दिल्ली या ठिकाणी एम्स रुग्णालय या ठिकाणी तो जाणार असून पुढील एक ते दीड वर्षांमध्ये आपल्या नगर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल उभारून रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळणार आहे त्यामुळे जरी मी बाहेर देशात शिक्षण घेतले असले तरीपण मी माझी संपूर्ण सेवा आपल्या भागातच करणार आहे असे यावेळी आदित्य ढाकणे यांने सांगितले यावेळी पत्रकार अशोक आव्हाड उपस्थित होते

त्यांचे वडील महादेव ढाकणे हे पैठण येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत शेतकरीव ग्रामीण भागातील या एक मुलगा इतक्या उच्च पदावर गेल्याने त्याचे कौतुक केले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button