व्यावसायिक स्वतःला तर उद्योजक समाजाला मोठ करतो – अनंत ढोले पाटील

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
व्यावसायिक व उद्योजक यांमधला सर्वात मोठा फरक म्हणजे व्यावसायिक स्वतःला मोठ करण्यासाठी समाजाचा उपयोग करतो. तर उद्योजक समाजाला मोठ करण्यासाठी स्वतःच्या संपत्तीचा उपयोग करतो. उद्योजकाला वेळ काळ नसते तो नेहमी त्याच्या उद्योगांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर असतो.असे प्रतिपादन चैतन्य ग्रुप प्रमुख श्री. अनंत ढोले पाटील यांनी केले
न्यू आर्ट्स, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेरच्या करिअर गायडन्स व प्लेसमेंट आंणि आयक्यूएसी आयोजित “उद्योजक होताना” ह्या व्याख्याना दरम्यान ते बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर म्हणाले की, आपण नोकरी करत असताना आपण दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राबतो त्यातून आपल्या फक्त गरजा पूर्ण होतात,स्वप्न नाही. व्यवसायाच्या माध्यमातून आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो व आताच्या आधुनिक युगात वाढत्या यांत्रिकीकरणामुळे रोजगाराची प्रचंड मोठी समस्या निर्माण झालेली आहे त्यामुळे तरुणपिढीने व्यवसायाकडे वळणे आता काळाची गरज बनली आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ.दिलीप ठुबे ह्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर म्हस्के,प्रास्ताविक करिअर गायडन्स अँण्ड प्लेसमेंटसेलचे प्रमुख प्रा.महेश गाणार व प्रा.अनिल ढोले यांनी आभार मानले.