राजूर महाविद्यालयाचे डॉ. टपळे यांना भारत सरकारचे पेटंट प्रदान

राजूर प्रतिनिधी
– येथील ऍड. एम. एन. देशमुख महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. बाळासाहेब टपळे यांना भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून त्यांनी केलेल्या संशोधनावर पेटंट मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख यांनी दिली.
मध हे रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे . मध गोळा करण्याच्या पारंपारिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचे पेट्यांमध्ये संगोपन करून आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते वैयक्तिक किंवा गट गटाने मधमाशी पालन सुरु करता येऊ शकते . मध व मेण यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एका पेटीत दहा फ्रेंड असतात फ्रेम मध्ये एकेक करुन मधमाशा शिरतात व मध जमा करतात. एका पेटीत साधारणपणे ३० ते ४० हजार मधमाशा राहतात. मधमाशी पालनासाठी पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मधमाशीपालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. मधमाशा फुलोरा येणा-या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे सूर्यफूल व विविध फळे यासारख्या पिकांच्या उत्पादनात वाढ होते.मधमाशांच्या पोळ्यात मधमाशांची संख्या, वाढ तसेच मधमाशांच्या शत्रू द्वारे मधमाशांचे प्रमाण कमी होते. अशी माहिती डॉ. टपळे यांनी दिली.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राजुर येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. बाळासाहेब टपळे यांनी मधमाशी पालनासाठी ” स्मार्ट हनी कोंब मॉनिटरिंग डिवाइस ” हे उपकरण तयार करून त्याचे पेटंट मिळविले आहे सदर पेटंट भारत सरकारच्या पेटंट जर्नल नं. ०६/२०२२ दि. ११ फेब्रुवारी 2022 रोजी प्रकाशित झाले आहे.
या उपकरणात विविध कॅमेरे बसविण्यात आले आहेत . त्याचा उपयोग मधमाशांच्या पोळ्या मध्ये विविध प्रकारचे संशोधन करण्यासाठी होणार आहे. मधमाशांच्या पोळ्या मधील हालचाली व त्यातील माहिती बाहेर डिस्प्ले वरती मिळणार आहे . सदर पेटंट प्रसिद्ध झाल्याबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष मा. एम. एन. देशमुख साहेब, संस्थेचे सचिव मा. टी. एन. कानवडे, सहसचिव मा. मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष मा. विवेकजी मदन, सत्यनिकेतन संस्थेचे सर्व सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.