शब्दगंध’ च्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शब्दगंध’ च्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
शेवगाव येथे दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी राजभाषा दिन तसेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मोलाच्या योगदाना निमित्त शब्दगंध साहित्यीक परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध एकूण सहा विषयांवरील निबंध लेखन स्पर्धेकरिता संपूर्ण नगर जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मान्यवर परीक्षकांनी तपासून खालीलप्रमाणे विद्यार्थ्यांना महात्मा सार्वजनिक वाचनालय शेवगाव येथे दिमाखदार कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री स्वाती राजेभोसले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेतील पारितोषिक विजेते विद्यार्थी खालील प्रमाणे प्रथम क्रमांक – चि. आर्यन आडकित्ते ( रु १हजार रोख व प्रशस्तीपत्र)
द्वितीय क्रमांक- कु. स्वराली मकासरे (रु ७०० रोख व प्रशस्तीपत्र)
तृतीय क्रमांक -कु. अमृता हरवणे (रु. ५०० रोख व प्रशस्तीपत्र ) तसेच उत्तेजनार्थ म्हणून चि. गौरव लांडगे, कु.ऋतुजा मोटकर कु.सृष्टी शेळके कु.निशा प्रजापति कु.श्रावणी पुंडे यांना रोख रू. २०० व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.शब्दगंध साहित्यीक परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लेखनाची आवड निर्माण व्हावी तसेच वाचन संस्कृती जोपासावी या उद्देशाने शालेय स्तरावर अनेक उपक्रम घेण्यात येत असल्याचे शब्दगंध साहित्यीक परिषदेचे शेवगाव तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र नजन यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी शब्दगंध साहित्य परिषदेचे बापूसाहेब गवळी तसेच श्री वैभव रोडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शब्दगंधचे विठ्ठल सोनवणे, पत्रकार शहाराम आगळे, आर .आर.माने, तसेच विविध स्तरातील नागरिक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश घेवरीकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक सुरेश शेरे यांनी आभार मानले.