राजूर पोलिस स्टेशन व देशमुख महाविद्यालय यांची संयुक्त जनजागृती रॅली संपन्न

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “हर घर तिरंगा ” या उपक्रमाची माहिती विद्यार्थी व नागरिकांपर्यंत व्हावी तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांची स्मृती जागविणे या हेतूने राजूर गावातून “आज जनजागृती रॅली”काढण्यात आली होती.या रॅलीतॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राजूर पोलीस स्टेशन मधील पोलीस व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख व मा.नरेंद्र साबळे ( पोलीस निरीक्षक, राजूर पोलीस स्टेशन) यांचे उपस्थितीत या रॅलीचा प्रारंभ झाला.

रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन दिलेल्या घोषणांनी राजूर परिसर दुमदुमून गेला होता. या रॅली ची सांगता राजूर पोलीस स्टेशन च्या परिसरात झाली.आपल्या समारोप भाषणात मा.नरेंद्र साबळे(पी.एस.आय) म्हणाले की ” सर्व नागरिकांनी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून देशाप्रती अभिमान बाळगावा.”या प्रसंगी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी देखील उद्बोधन पर विचार मांडले. प्रा. विनोद
येलमामे यांनी उपस्थितांचे आभार मानले. रॅली यशस्वी होण्यासाठी डॉ.एल बी.काकडे , प्रा. अस्वले, प्रा कुसमुडे, गवळी मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आदींनी विशेष परिश्रम घेतले.
