मजलेशहर सेवा संस्थेच्या चेअरमनपदी ताराचंद लोंढे तर व्हाईस चेअरमनपदी नवनाथ फासाटे बिनविरोध !

शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील मजलेशहर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ताराचंद लोंढे तर व्हाईस चेअरमनपदी नवनाथ फासाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे शेवगाव तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मजलेशहर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बिनविरोध झाली. असून संस्थाही गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे संस्थेचे चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध झाली चेअरमन पदासाठी ताराचंद लोंढे यांचा अर्ज होता त्यांना सुचक राजाराम बापूसाहेब लोंढे तर अनुमोदक रामनाथ विठोबा पिसुटे होते तर व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने नवनाथ फासाटे यांची बिनविरोध करण्यात आली. त्यांना सुचक अण्णासाहेब मुरलीधर पिसुटे तर अनुमोदन प्रभाकर यशवंत मुगुटमल होते. निवडणूक निर्णय अधिकारी ए एन लोखंडे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव दत्तात्रय लोंढे यांनी काम पाहिले. या निवडीचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे शेवगाव पाथर्डी चे आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले आहे यांच्यासह परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.