रोटरीचा इंटरॅक्ट वीक उत्साहात

एन्कलेवच्या ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
नाशिक दि 28 रोटरी इंटरनॅशनलच्या ११७ व्या वर्धापन दिनानिमित्ताने नाशिक रोटरी एन्कलेवच्या वतीने इंटरॅक्ट वीक सप्ताह रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या उपस्थितीत नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंटरॅक्टच्या १४ क्लबच्या सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांत सहभाग नोंदवला.
रोटरी क्लब ऑफ नाशिक एन्कलेवच्या वतीने नाशिक महानगरमधील शाळांतील १२ ते १८ वयोगटातील मुलांमधील नेतृत्व गुणांना संधी देण्यासाठी इंटरॅक्ट क्लबची स्थापना केली जाते. इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडाभर फुलांची रांगोळी, खो खो, चित्रकला, रोबोटिक्स कार्यशाळा, ऑनलाइन वादविवाद स्पर्धा, विशेष विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ सामनापासून टिकाऊ वस्तू बनविणे अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
आठवडाभर पार पडलेल्या या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ हॉटेल सूर्या येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या हस्ते पार पडला. या वेळी रमेश मेहेर व शारदा मेहेर यांनी सर्व मुलांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सप्ताहाचे संयोजन रोटरी नाशिक एन्कलेवचे चेअरमन संजय कलंत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरीचे उपप्रांतपाल अनिल सुकेणकर, भावना ठक्कर, राजेंद्र पवार, डॉ. आवेश पलोड, अदिती अग्रवाल, कीर्ती टाक, सुचेता महादेवकर, मुग्धा लेले, मनीषा विसपुते, माधवी सुकेणकर, दुर्गा साळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते –
आलिशा जाधव, शनाया सावंत, ध्रुव नारंग गोयल काजगे, मोहित पांचाळ हे प्रथम विजेते ठरले. तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत फ्रावशी अकॅडमी, खो-खो (मुले) आदर्श विद्या मंदिर, (मुली) शासकीय मुलींची शाळा.
वादविवाद स्पर्धा
इंग्रजी – अथर्व मिश्रा
मराठी – अनुष्का मोहोळ